बीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजच्या काळात मोबाईल हे जणू काही प्रत्येकाच्या हातातील खेळणे झाले आहे. कोणतेही महत्त्वाचे काम असो किंवा नसो प्रत्येकाच्या हातात मोबाईल हा असतोच अगदी लहान मुले देखील तासंतास मोबाईलशी खेळत असतात, परंतु या मोबाईल असून धोका देखील आहे. कारण त्याचा स्फोट होऊ शकतो, त्यामुळे लहान मुलांना मोबाईल पासून दूर ठेवायला हवे असेच प्रकारची घटना मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात घडली. धारूर तालुक्यात अमला येथे असाच एक धक्कादायक प्रकार आला असून, बंद पडलेल्या मोबाईलसोबत खेळत असताना अचानक मोबाईलचा स्फोट होऊन सात वर्षाच्या मुलाचे तोंड भाजले. त्यामुळे पालकांमध्ये खळबळ उडाली असून, आता लेकरांना मोबाईल देतांना विचार करण्याची वेळ आली आहे.
कॉटवर बसून खेळत होता
याबाबत अधिक माहिती अशी की, अमला येथील बाळासाहेब सोळंके हे कामानिमित्त पनवेल येथील बस आगारात कार्यरत असून, ते स्वतः मुंबईला राहतात. मात्र, आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी धारूर येथे त्यांनी भाडेतत्वावर घर घेतले आहे. त्यांचा सात वर्षांचा मुलगा अनिकेत सोळंके हा धारूर येथील जनता प्राथमिक विद्यालय येथे दुसरीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. अनिकेत हा बंद पडलेला मोबाइल हातात घेऊन कॉटवर खेळत होता. मात्र, खेळत असतानाच अचानक मोबाइलचा स्फोट झाला. त्यामध्ये अनिकेतचं तोंड भाजून निघाले असून, तो गंभीर जखमी झाला आहे. तर बाजूलाच असलेल्या कपड्यालाही यामुळे आग ही लागली होती.
आई आली धावत
अनिकेत बंद पडलेल्या मोबाईलसोबत खेळत असतानाच अचानक झालेल्या स्फोटचा जोरदार आवाज आला. त्याच्या आईने आवाज ऐकून तत्काळ मुलाला बाजूला काढून आग विझविली. मुलगा अनिकेत याला धारूर येथील ग्रामीण रुग्णालय येथे नेऊन त्याच्यावर उपचार करण्यात आले आहे. या अपघातामध्ये अनिकेतचे तोंड चांगलेच भाजले आहे. विशेष म्हणजे, अनिकेतची आई घरी होती म्हणून मोठा अनर्थ टळला आहे, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. ही घटना त्याच्या वडिलांना कळतात त्यांना मुलाविषयी काळजी वाटू लागली यासंदर्भात त्यांनी अधिक माहिती घेऊन मुलावर चांगले उपचार करण्याचे सांगितले, तसेच ते तातडीने मुलाकडे रवाना झाले.
beed mobile children horror crime