इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बीड जिल्ह्यातील १३ सरपंच तर ४१८ ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी रद्द केले आहे. जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने ही कारवाई केली आहे. या आदेशामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
या कारवाईत बीड जिल्ह्यातील आष्टी, अंबाजोगाई, वडवणी, पाटोदा, माजलगाव, केज आणि धारुर तालुक्यातील ४१३ ग्रामपंचायत सदस्य आणि १३ सरपंचाचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नगारिकांचा मागास प्रवर्गासाठीच्या राखीव असलेल्या जागांवर निवडणूक लढविणा-या व्यक्तीस जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र निवडून आलेल्या दिनांकापासून बारा महिन्याच्या कालावधीत सादर करणे आवश्यक आहे. मात्र २०२० पासून पुढे झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकीमध्ये राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या अनेक सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.