इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावातील अमानुष मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यावर आता संताप व्यक्त केला जात आहे. मारहाण करणारा हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले असून या प्रकरणाचा शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रश्नांवर सोशल मीडियात पोस्ट टाकून विविध प्रश्न उपस्थित केले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, हे काय आहे काय ? गृहमंत्र्यांनी आणि श्री सुरेश धस यांनी उत्तर द्यावे. हा मारणारा माणूस सुरेश धस चा कार्यकर्ता आहे का ?
बीडच्या शिरूर तालुक्यात गुंडगिरीचा हा व्हिडीओ पहा…तर दुस-या पोस्टमध्ये त्यांनी एसपी नवनीत कावत यांच्याशी बोलले. त्यांनी सांगितले की हा व्हिडिओ जुना आहे. FIR झाली नाही कारण कोणी कंप्लेंट केली नाही. आज ते Suo Moto कंप्लेंट घेत आहेत आणि तत्काळ कारवाई करतील.
हाच तो सतीश भोसले ? कोण आहे हा ? कुठून आले एवढे पैसे? अटक करा या माणसाला अशी तिसरी पोस्ट केली आहे. या प्रकरणावरुन विधीमंडळात सुध्दा चर्चा झाली.दरम्या आमदार सुरेश धस यांनी हा कार्यकर्ता माझा असल्याचे सांगून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असे सांगितले. मी मारहाणीचे समर्थन करत नाही असेही त्यांनी सांगितले.