शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

संतापजनक! अवघ्या ५ वर्षीय बालिकेवर ५२ वर्षांच्या नराधमाचा बलात्कार… बीड जिल्हा हादरला…

ऑगस्ट 11, 2023 | 1:43 pm
in राष्ट्रीय
0
rape3

बीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवरील अत्याचाराचे घटना वाढल्या आहेत. अल्पवयीन मुलीवर देखील अत्याचार होत असल्याने समाज कोणत्या स्तराला चालला आहे, असे वाटण्या इतपत वाईट परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. खरे म्हणजे काही हैवान व्यक्तीच्या लोकांमुळे सर्व समाजच नव्हे तर गाव, तालुका, जिल्हा देखील बदनाम होत आहे. बीड जिल्ह्यात एका ५ वर्षाच्या बालिकेवर ५२ वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याने संपूर्ण बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे, इतकेच नव्हे तर संपूर्ण केज तालुक्यात या घटनेविरुद्ध संतापाची लाट उमटत आहे.

घरात बोलवून…
या भयानक घटनेबद्दल पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, केज तालुक्याच्या हद्दीतील एका गावामध्ये मजुरी करून जगणाऱ्या कुटुंबातील चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला आहे. पीडित चिमुकली शेजारी राहणाऱ्या नराधम आरोपी अरुण याच्या नातवंडासोबत खेळत होती. खेळत असताना अरुणने या चिमुकलीस घरात बोलावून घेतले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. शारीरिक अत्याचार झाल्यामुळे ती मुलगी रडत होती. घरी आल्यावर सुद्धा तिचे रडणे थांबले नाही. तेव्हा आईने अधिक चौकशी केली. चिमुकलीने सर्व काही सांगताच आईला मोठा धक्का बसला. याप्रकरणी पीडित चिमुकलीच्या आईने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. नराधमा आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपचार सुरू
महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत असताना बीड जिल्हयातील क्रूरतेचा कळस गाठणारी ही घटना समोर आली आहे. आता पीडित चिमुकलीवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेने केज तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. कारण लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराचे प्रमाण देखील वाढत आहे. ५ वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर देखील अत्याचाराच्या घटना घडत आहेत. शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींना चांगला स्पर्श वाईट स्पर्श याबद्दल माहिती देण्यात येते, परंतु शाळेत जाण्याची समज येण्या पूर्वीच मुलांवर जर असे अत्याचार घडत होत असतील, तर आता काय करावे ? असा प्रश्न देखील पालकांना पडू शकतो.

A 5-year-old girl was sexually assaulted
Beed Crime Minor Girl Rape Police Booked
Abuse Posco
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘या’ महापालिका आयुक्तांची तडकाफडकी बदली… ‘ते’ प्रकरण अंगलट येणार

Next Post

अचानक आढळला बिबट्याचा बछडा… परिसरात मादी असल्याची भीती… येवला तालुक्यातील घटना…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
IMG 20230811 WA0159 e1691738252925

अचानक आढळला बिबट्याचा बछडा... परिसरात मादी असल्याची भीती... येवला तालुक्यातील घटना...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011