बीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या संदर्भात सर्वच माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध होत आहेत, परंतु त्यात काहीही फरक पडताना दिसून येत नाही. याउलट या घटना वाढतच चालल्या आहेत. पोलिसांचा कोणालाही धाक वाटत नाही, नेमके असे का घडत आहे? याचा कोणीही विचार करताना दिसत नाही, बीड सारख्या जिल्ह्यात तर गुन्हेगारीचे रोजच वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत, त्यातच आता एका गुंड प्रवृतीच्या तरूणाने अगदी शुल्लक कारणावरून चक्क हॉटेलमध्येच गोळीबार केला या प्रकरणाने चांगलीच खळबळ उडाली आहे.
वादावादीतून हाणामारी
परळी जवळील कन्हेरवाडी शिवारात ही घडली असून याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कन्हेरवाडी शिवारात सुरेश फड यांचे एक हॉटेल असून आता विलास आघाव सुमारे वर्षभरापासून हे चालवत आहेत. या ठिकाणी रात्री एक वाजण्याच्या सुमारास चौघा जणांचे टोळके चहा पिण्यासाठी आले. चहा प्यायल्यानंतर त्यांनी हॉटेलमधील नोकराकडे सिगारेटचे पाकीट मागितले. मात्र, हे पाकिट महाग दिले म्हणून त्या ग्राहकांनी वाद घातला. त्यानंतर बाचाबाची आणि वादावादी वाढून हा प्रकार मारहाणीवर पोहचला, तेव्हा चौघांपैकी एकाने स्वतःकडील पिस्तूलातून हवेत गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकून नोकरांनी हॉटेलचे शटर लावून घेतले. त्यामुळे संतापलेल्या या तरूणाने शटरवर पुन्हा दोन राउंड फायर केले. हा आवाज ऐकून शिवारातील आणि रस्त्यावरील लोक धावत आले, गर्दी जमा झाल्याने सर्वत्र चर्चा सुरू झाली असून या प्रकरणामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
The firing was done because a packet of cigarettes was paid dearly Beed Crime Cigarettes Packet Costly Hotel