नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जंकफूड खाण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. त्याबद्दल अनेक जण बोलत असतात. जंकफूड खाऊ नये, असा सल्ला डॉक्टर देत असतात. मात्र, तरीदेखील असे पदार्थ खाणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी संसदेत दिलेली माहिती धोक्याची घंटा मानायला हरकत नाही. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी ५ लाख ४० हजार जण जंकफुडमुळे बळी पडत आहेत. ही स्थिती धोकादायक असून वेळीच सावध होण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
मेदाचे अधिक सेवन करणे आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे डॉक्टर सांगतात. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येते. मेदामुळे दरवर्षी ५ लाख ४० हजार लोकांचा मृत्यू होत आहे. अपायकारक मेदा म्हणजेच ट्रान्स फॅटी ॲसिडमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो अशा प्रकारची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली आहे. पिझ्झा, बर्गर, बेकरी उत्पादने सोबतच स्वयंपाकात वापरले जाणारे विविध प्रकारचे तेल, सॉस, जॅमसारख्या माध्यमातून मेद शरीरात जातात. पिझ्झा आणि बर्गर तसेच बेकरी प्रोडक्टवर लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत तुटून पडताना दिसता.
पण आपल्या पोटात जो पिझ्झा जातो शरीरासाठी हानिकारक आहे. यात ह्या सर्व गोष्टी आहेत ज्यामुळे ट्रान्स फॅटी ॲसिड शरीरात जातात. ट्रान्स फॅटचे जास्त सेवन केल्याने मृत्यू होण्याचा धोका ३४ टक्के आणि हृदयविकाराने मृत्यू होण्याचा धोका २८ टक्के वाढू शकतो अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. दरम्यान, हे ट्रान्स फॅटी ॲसिड म्हणजेच अपायकारक मेदा तुमच्या शरीरावर कसा परिणाम करतो हे डॉक्टर वेळोवेळी सांगतात.
जागतिक स्तरावरही स्थिती गंभीर
जागतिक स्तरावर दरवर्षी सुमारे पाच अब्ज नागरिकांना अपायकारक मेदामुळे (ट्रान्स फॅट) हृदयविकाराच्या धोक्याला सामोरे जावे लागत असल्याची माहिती आहे. जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केलेल्या अहवालात या नागरिकांना तीव्र हृदय विकार, हृदयविकाराचा झटका येण्याचा तसेच मृत्यू होण्याचा धोका अधिक असल्याचे म्हटले आहे. भारतातील ४.६ टक्के हृदयरोगाचे मृत्यू ट्रान्स-फॅटी अॅसिडच्या सेवनाने संबंधित असू शकतात अशी भीती मांडवीय यांनी व्यक्त केली आहे.
Be careful, you eat pizza, burger…