नवी दिल्ली – कोविड लशीच्या नोंदणीसाठी एसएमएस पाठवून युजर्सच्या अँड्रॉइड फोनमधून त्यांचा खासगी डाटा चोरण्याचा प्रयत्न भामटे करत आहेत. त्यामुळे कोरोनाची लस जरूर घ्या पण त्यासाठी सरकारी अॅपवर नोंदणी करावी. लसीकरणाच्या खोट्या संदेशांमधील लिंकचा वापर करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
खोटे लस नोंदणी एसएमएस पाठवून युजर्सच्या फोनमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. अशा नुकसान करणा-या एसएमएसच्या पाच प्रकारांची माहिती समोर आली आहे. त्यापासून दूर राहिले पाहिजे असा इशारा केंद्रीय सायबर संरक्षण संस्थेने दिला आहे.
-
खोटे एसएमएस संदेश पाठवून त्यांच्या अॅपवरून कोविड लशींसाठी नोंदणी केली जाऊ शकते असा दावा करण्यात येत आहे, असे इंडियन कॉम्प्युटर इमर्जंन्सी रिस्पॉन्स टिमने (सीईआरटी) जारी केलेल्या दिशा निर्देशांमध्ये म्हटले आहे.
-
एसएमएसमध्ये एक लिंक दिली जाते. त्यावर क्लिक केल्यावर एक संशयास्पद अॅप इन्स्टॉल होते. खोटे नाव, ई-मेल किंवा मेसेजमधून तुमच्या डाटावर हॅकर्स कब्जा करणार नाही यासाठी सर्वांनी सतर्क राहिले पाहिजे, असे सांगण्यात आले आहे.
-
संशयास्पद अॅप इन्स्टॉल झाल्यानंतर पीडित युजरच्या फोनमधील दुसर्या नंबरवर हे मेसेज आपोआप पाठविले जातात. हे अॅप अनावश्यक पद्धतीने मंजुरी मिळवितात. त्यानंतर हॅकर्स युजरच्या डाटावर कब्जा करू शकतात.
-
संशयास्पद लिंक
-
Covid19.apk, Vaci_Regis.apk, MyVaccin_v2.apk, Cov-Regis.apk and Vccin-Apply.apk या संशयास्पद लिंकची ओळख पटली असून त्यावर क्लिक करू नये. फक्त सरकारी पोर्टल : //cowin.gov.in. वर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.