नवी दिल्ली – कोरोना विषाणूचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. बंगालसह ३ राज्यांमध्ये कोरोनाचा परिणाम दिसून येत आहे. नुकतीच झालेली दुर्गापूजा आणि दसरा याला कारणीभूत असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये शनिवारी कोरोनाचे ९७४ रुग्ण आढळले आहेत. या वर्षी १० जुलैनंतर तीन महिन्यात एका दिवसात आढळणारी सर्वाधिक संख्या आहे. गेल्या चार दिवसात बंगालमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या ८०० हून अधिक झाली आहे. आसाम आणि हिमाचल प्रदेश या राज्यातही या आठवड्यात रुग्णसंख्या वाढलेली आहे.
भारतात शनिवारी १५,९१८ नवे रुग्ण नोंदविले आहेत. यामध्ये मणिपूर आणि झारखंडची आकडेवारी रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाही. पश्चिम बंगालमध्ये या आठवड्यात रुग्णांची संख्या स्पष्टपणे वाढली आहे. गेल्या सात दिवसांमध्ये राज्यात ५,५६० नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या सात दिवसांत (४,३२९) च्या तुलनेत २८.४ टक्के अधिक आहेत. दुर्गापूजेत झालेल्या गर्दीमुळे रुग्णसंख्या वाढल्याचे बोलले जात आहे. गेल्या सात दिवसांच्या संख्येची तुलना तीन आठवड्यापूर्वी (५,०३८) आढळलेल्या रुग्णांशी केली असता त्यामध्ये १०.४ टक्क्यांची वाढ दिसून येते.
सात दिवसांत नव्या रुग्णांच्या संख्येत ५०.४ टक्क्यांची वृद्धी दिसून आली आहे. गेल्या सात दिवसात १,४५४ रुग्णांच्या तुलनेत राज्यात २,१८७ नवे रुग्ण नोंदवले गेले आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये सात दिवसांत ३८.४ टक्के रुग्ण वाढले आहेत. हिमाचलमध्ये गेल्या सात दिवसात ९१४ रुग्णांच्या तुलनेत गेल्या सात दिवसात १,२६५ रुग्ण वाढले आहेत. हिमाचलमध्ये शनिवारी २५७ नवे रुग्ण आढळले आहेत. २१ सप्टेंबरमध्ये ३४५ रुग्ण आढळल्याच्या एका महिन्यातच सर्वाधिक आहेत.
केरळमध्ये शनिवारी ८,९०९ रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात १,७०१ आणि तामिळनाडूमध्ये १,१४० नवे रुग्ण आढळले आहेत. शनिवारी कोरोनामुळे १५९ रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या दिवसातील २०२ आणि २३१ मृत्यूंपेक्षा कमी आहेत. केरळमध्ये शुक्रवारी ९९ हून कमी ६५ मृत्यू नोंदविले गेले आहेत. महाराष्ट्रात ३३ मृत्यू, तामिळनाडूमध्ये १७ आणि बंगालमध्ये १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.