विशेष प्रतिनिधी, मुंबई
यंदाच्या टी २० वर्ल्ड कप बाबत मोठा खुलासा झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक आयोग (बीसीसीआय)चे सचिव जय शहा यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. बीसीसीआयच्यावतीने दरवर्षी आयोजित केले जाणारे आयपीएल हे कोरोना प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आले आहे. पुढील सत्र केव्हा घेण्यात येईल याबाबत विचारमंथन सुरु आहे. त्यातच यंदा टी २० वर्ल्ड कपचेही आयोजन आहे. ही जबाबदारी बीसीसीआयकडे आहे. भारतात हा वर्ल्डकप होण्याचे पूर्वनियोजित असले तरी कोरोनाची संभाव्य तिसरी लाट पाहता तो होईल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे संपूर्ण क्रिकेटप्रेमींचे याकडे लक्ष लागले आहे. अखेर यासंदर्भात शहा यांनी घोषणा केली आहे की, आज आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल (आयसीसी)ला कळविले आहे की, आम्ही टी २० वर्ल्ड कप भारतात नाही तर दुबईत (युएई) आयोजित करु इच्छितो. यासंदर्भात आयसीसीकडून तारखांची घोषणा केली जाणार असल्याचेही शहा यांनी स्पष्ट केले आहे.
https://twitter.com/ANI/status/1409433236221005826