मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टी २० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाची निवड करण्यात आली असून, यात अनेक खेळाडूंना संधी मिळाली आहे. तर काही खेळाडूंचे नाव अनपेक्षितपणे समोर आले आहे. विश्वचषकाविषयी तसेच क्रिकेटसंदर्भातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बीसीसीआयच्या आढावा बैठकीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. मात्र, यातील अनेक विषय, मुद्दे बीसीसीआयसाठी तापदायक ठरल्याची चर्चा आहे.
बीसीसीआयने टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. यासोबतच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या टी २० मालिकेसाठीही संघाची घोषणा करण्यात आली. २० सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी २० मालिका सुरू होत आहे. यापूर्वी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह यांनी आशिया कपमधील टीम इंडियाच्या खराब कामगिरीबाबत राष्ट्रीय निवड समितीशी चर्चा केली.
खराब कामगिरीवरही प्रकाश

BCCI Meet Indian Team Cricket Team Performance