मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आपला वार्षिक करार जाहीर केला आहे. BCCI ने जाहीर केलेल्या यादीत A+ मध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहलीसह वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अव्वल श्रेणीत आहेत. मात्र कसोटी संघातून वगळण्यात आलेल्या चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना या नियमाचा फटका बसला आहे. बीसीसीआयने यंदाच्या करारासाठी एकूण २८ खेळाडूंची निवड केली आहे. अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने केलेल्या शिफारशीच्या आधारे बोर्डाने खेळाडूंना कायम ठेवण्याची यादी जारी केली आहे. सर्व खेळाडूंचा हा करार 1 ऑक्टोबर 2021 ते सप्टेंबर 2022 पर्यंत आहे.
विशेष म्हणजे A+ ग्रेडमध्ये कोणताही बदल झालेला नाही, तर B श्रेणीतील 10 खेळाडूंची संख्या निम्मी करून 5 करण्यात आली आहे. बी श्रेणीतील संख्या यावर्षी 5 वरून 7 पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्याचबरोबर 10 ऐवजी 12 खेळाडूंना सी ग्रेडमध्ये स्थान देण्यात आले आहे. बीसीसीआयचा वार्षिक करारानुसार, A+ श्रेणीमध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंना वार्षिक 7 कोटी रुपये वेतन मिळते. त्याच वेळी, ए, बी आणि सी श्रेणीतील खेळाडूंना संपूर्ण वर्षासाठी अनुक्रमे 5, 3 आणि 1 कोटी रुपये वेतन म्हणून दिले जाते. बीसीसीआयने जारी केलेल्या करारातून फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि वेगवान गोलंदाज नवदीप सैनी यांची नावे वगळण्यात आली आहेत. मोहम्मद सिराजला त्याच्या चांगल्या कामगिरीचे बक्षीस C ग्रेड वरून B मध्ये बढतीच्या रूपात मिळाले आहे.
शिखर धवन, हार्दिक पांड्या आणि इशांत शर्मा यांची ए श्रेणीतून सी श्रेणीत तर भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मयंक अग्रवाल आणि वृद्धिमान साहा यांची बी मधून सी श्रेणीत पदावनती करण्यात आली आहे.
अव्वल खेळाडूत A+ ग्रेड विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, ग्रेड एआर अश्विन, रवींद्र जडेजा, केएल राहुल, मोहम्मद शमी, ऋषभ पंत.
ग्रेड बी चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा यांचा समावेश होता.
ग्रेड सी शिखर धवन, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, शुभमन गिल, हनुमा विहारी, युझवेंद्र चहल, सूर्यकुमार यादव, वृद्धिमान साहा, मयंक अग्रवाल यांचा समावेश आहे.