इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – टीम इंडिया मध्ये अनेक तरुण खेळाडू चांगली कामगिरी करतात, त्यापैकीच एक म्हणजे ऋषभ पंत हा क्रिकेट खेळाडू असून तो मधल्या फळीत भारतीय संघाकडून तसेच आयपीएलमध्ये दिल्ली क्रिकेट संघ आणि दिल्ली कॅपिटल्स कडून खेळतो. परंतु मधल्या काळात त्याला दुखापत झाल्याने तो संघाबाहेरच होता मात्र आता ऋषभ पंत पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
टीम इंडिया आणि बांग्लादेशमध्ये २ सामन्यांची कसोटी मालिका दि. १४ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप लक्षात घेता, टीम इंडियासाठी ही सीरीज महत्त्वाची आहे. ऋषभ पंत सुद्धा या सीरीजमध्ये खेळणार आहे. ऋषभ पंत आधी वनडे टीमचा भाग होता. पण सीरीजआधी त्याला दुखापत झाली होती. परंतु आता ताजी माहिती कळाली की, ऋषभ पंतने मॅनेजमेंटकडे आराम मागितला आहे. मात्र बोर्डाकडून यावर काहीही सांगण्यात आलेले नाही. कारण त्याचा सध्याचा फॉर्म खराब असून त्याच्यावर सातत्याने त्याच्यावर टीका होत आहे. वास्तविक सन २०१६ मध्ये त्याच्या नावाचा समावेश भारतीय संघात झाल्यानंतर एका मालिके दरम्यान पंतने वेगवान अशा फक्त १८ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. तसेच सन २०१७ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय टी२० भारतीय संघात पदार्पण केले, ऑगस्ट २०१८ला कसोटी सामना, आणि ऑक्टोबर २०१८ रोजी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले होते.
ऋषभ पंत टीम इंडियाची पहिली पसंत आहे, असा एक समज होता. कारण तो वनडे, टेस्ट आणि टी २० तिन्ही फॉर्मेट मध्ये खेळतो. त्यामुळे त्याला वगळल्यानंतर प्रश्न विचारले जाणे हे स्वाभाविक होते. त्यानंतर जुलै महिन्यात टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध एक कसोटी मॅच खेळली होती. तेव्हा कर्णधार रोहित शर्माला करोनाची लागण झाली होती, तर राहुल दुखापतीमुळे संघाबाहेर होता. इंग्लंड विरुद्धच्या त्या मॅचसाठी जसप्रीत बुमराहने संघाचे नेतृत्व केले होते. तर विकेटकीपर ऋषभ पंतला उपकर्णधार करण्यात आले होते. यावेळी मात्र पंतकडून ही जबाबदारी काढून टाकण्यात आली आहे.
पंत केल्या काही काळापासून फॉर्ममध्ये देखील नाही. वनडे आणि टी-२० संघात देखील त्याच्या असण्यावरून प्रश्न उपस्थित केले जात होते. टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध आपला शेवटचा कसोटी सामना खेळला होता. रोहित शर्मा दुखापतीमुळे त्यावेळी टीममध्ये नव्हता. जसप्रीत बुमराहने नेतृत्व केलं होतं. ऋषभ पंत उपकर्णधार होता. बांग्लादेश विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यातही रोहित शर्मा नव्हता. केएल राहुल टीमच नेतृत्व करत असून चेतेश्वर पुजारा उपकर्णधार आहे. पुजाराच कसोटी संघातील स्थान पक्क नाही. मात्र ऋषभ पंतला उपकर्णधार पदावरुन हटवण्यात आल्याने अनेक चहाते हैराण आहेत. या युवा क्रिकेटरने आता बोर्डाचा विश्वास गमावलाय का? असा प्रश्न विचारला जातो आहे.
खरे म्हणजे पंतची कसोटीमधील कामगिरी खूपच चांगली आहे. ऑस्ट्रेलिया शिवाय इंग्लंडमधील विजयात त्याने योगदान दिलय. ऋषभ पंतला न्यूझीलंड विरुद्ध टी 20 आणि वनडे सीरीजमध्ये संधी मिळाली. पण तो कुठल्याही सामन्यात साधी 20 धावांची इनिंग खेळू शकला नाही. मात्र एकवेळ केएल राहुलसोबत पंत हा कॅप्टनशिपच्या रेसमध्ये होता. पण पंत आता त्यामध्ये मागे पडला आहे. मात्र पंतने यापुर्वी पाच वेळा टी 20 इंटरनॅशनल सामन्यात टीम इंडियाच नेतृत्व केले आहे. यात २ सामन्यात विजय मिळाला तर २ सामन्यात पराभव झाला. एका मॅचचा रिजल्टच लागला नाही. दरम्यान, मी बाहेर का? असा प्रश्न ऋषभ पंतने विचारलेच म्हटले जात आहे. त्यामुळे नेटकऱ्यांना ऋषभ पंतचे हे उत्तर काहीसे उद्धट वाटत आहे काहींनी ऋषभ पंतचे मजेशीर मिम्स सुद्धा बनवायला सुरुवात केली आहे.
महत्वाचे म्हणजे बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे खेळत नाही. अशा परिस्थितीत संघाची सुत्रे उपकर्णधार केएल राहुलच्या हाती आली. पण जेव्हा नवीन उपकर्णधार निवडण्याचा मुद्दा आला तेव्हा बोर्डाने ऋषभ पंतऐवजी पुजारावर विश्वास व्यक्त केला. तसेच या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा रोहित शर्माला संघाचा कर्णधार बनवण्यात आले तेव्हा बोर्डाने सांगितले की, भविष्यात संघाची धुरा ही राहुल, पंत आणि बुमराहसारख्या खेळाडूंच्या हातात जाईल. मात्र या मालिकेत बोर्डाने पंतकडे दुर्लक्ष केले असून त्याची आता सर्वत्र चर्चा सुरू आहे.
असा आहे संघ :
केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएस भरत, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यू ईश्वरन, नवदीप सैनी, सौरभ कुमार, जयदेव उनाडकट.
BCCI Indian Cricket Team Rishabh Pant Decision
Sports