मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – क्रिकेट टीम इंडियाच्या सिनियर महिला संघाच्या फलंदाजीच्या प्रशिक्षक पदी ऋषिकेश कानिटकर यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे दि. ९ डिसेंबर पासून टीम इंडियाचा महिला संघ हा ऑस्ट्रेलियासह टी २० मालिका खेळणार आहे. पाच सामन्याच्या मालिकेची पूर्वतयारी करताना बीसीसीआयने ऋषिकेश कानिटकर यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. महिला संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारताना कानिटकर यांनी हा आपल्यासाठी मोठा सन्मान असल्याचे म्हंटले आहे. भारताच्या महिला संघात अनेक गुणी व अष्टपैलू खेळाडू आहेत. तसेच ही जबाबदारी निभावताना आपल्यालाही खूप काही शिकायला मिळणार आहे असेही कानिटकर म्हणाले आहेत.
विशेष म्हणजे कानिटकर अंडर १९ पुरुष क्रिकेट संघाचा कोच होता. त्याच्या कार्यकाळात भारतीय संघाने अंडर -१९ वर्ल्डकप जिंकला होता. यश धूल त्या संघाचा कर्णधार होता. यासोबतच भारतीय महिला संघाचा माजी प्रशिक्षक रमेश पोवार याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाठवण्यात आले आहे. पोवार येथे व्हीव्हीएस लक्ष्मणच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. महिला संघासोबत दीर्घकाळ काम केलेला पोवार आता पुरुष खेळाडूंसोबत काम करणार आहे. टीम इंडियाला नवा प्रशिक्षक मिळावा यासाठी मागील काही दिवसांपासून अनेक स्तरावर चर्चा सुरु आहे. आता बीसीसीआय ने याबाबत निर्णय घेत राहुल द्रविडच्याच स्वीय सहकाऱ्याची कानिटकरची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी नेमणूक केली आहे. याबाबत बीसीसीआयने स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे.
दरम्यान, आगामी महिला टी-२० विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून बीसीसीआयने हृषिकेश कानिटकरला भारतीय संघाचा फलंदाजी प्रशिक्षक बनवले आहे. महिला T20 विश्वचषक २०२३ हा दक्षिण आफ्रिकेत दि. १० ते २६ फेब्रुवारी दरम्यान आयोजित केला जाणार आहे. हृषीकेश कानिटकर याला प्रशिक्षणासोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव आहे.
https://twitter.com/BCCI/status/1600055326882992129?s=20&t=_2duIvGV9jIB-L-qAEkDWw
BCCI Indian Cricket Team New Coach Appointment