नाशिक: सद्या सर्वत्र गणेशोत्सव सुरू आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. राज्य सरकारने उत्सव साजरा करण्यावर अनेक निर्बंध घातले आहेत. त्या मुळे नेहमी सारखा जल्लोषात साजरा होणारा गणेशोत्सव छोट्या खाणी साजरा होताना दिसत आहे. परंतु घराघरात गणेशउत्सवाची धूम वेगळीच असते, कोरोनामुळे घरगुती उत्सव साजरा करण्यावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. असाच उत्सव नाशिक मध्ये साजरा होताना दिसत आहे. शहरातील बावरी परिवाराने यंदा वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृतीपर देखावा साकारला आहे. आपल्या नेहमीच्या पर्यावरण पूरक शैलीत यंदाच्या वर्षीही समाजप्रभोदन करण्याचे आपले कर्तव्य समजून हा देखावा साकारण्यात आला आहे. सद्या नाशिक शहरात वाहतूक नियमांबाबत वाहतूक पोलिसांमार्फत अनेक वेगवेगळ्या संकल्पना राबविण्यात येत आहे. जेणेकरून नागरिकांनी आपले कर्तव्य समजून स्वतःसाठी व इतरांसाठी आखून दिलेले वाहतूक नियम पाळावे.
याच धर्तीवर नाशिकरांनी वाहतूक नियम पाळावे यासाठी बावरी परिवाराने आपल्या देखाव्यातून चक्क श्री गणेश वाहनचालकांना वाहतूक नियमांबाबत जनजागृती करताना दाखविण्यात आले आहेत. या देखाव्यात हेल्मेटचा वापर, झेब्रा क्रॉसिंग, दिशादर्शक फलक, वाहनांची वेगमर्यादा व इतर नियमांबाबत जनजागृती केली आहे. या मध्ये रस्तावरील वाहने, सिग्नल व्यवस्था, शाळा, रुग्णालय, इमारत, उद्यान दाखवून पायी जाणाऱ्या वृद्ध, युवा, विध्यार्थी दाखविण्यात आले आहे. वाहनचालक, विध्यार्थी व नागरिक वाहतूक नियमांचे पालन करत आहेत हे दृश्य दाखवीत वाहतूक नियमांची किती गरज आहे हे जाहिरात फलकातून साकारण्यात आले आहे. आज शहरात “नो हेल्मेट नो पेट्रोल” मोहीम सुरू आहे. तसेच वाहन चालविताना नियम न पाळणाऱ्या नागरिकांचे वाहन दोन तास जमा करून त्याचे समुउपदेशन करण्यात येत आहे. हे करण्याची आज गरज भासत आहे त्याचे कारण की, शहरात खाजगी वाहनांची वाढती संख्या होय. एकीकडे वाहनांची संख्या वाढ आहेत त्या मुळे अपघाताचे प्रमाण पण जास्त वाढले आहेत. यात नियमांचे पालन न केल्याने अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. दुचाकी अपघातात हेल्मेट न घातल्याने मृत्यूचे प्रमाण पण खूप असल्याने पोलीस आयुक्त दीपक पांडये यांनी ही मोहीम हाती घेतली आहे.
या मोहिमेस पाठिंबा देत रामसिंग बावरी परिवाराने वाहतूक नियमाचे पालन करण्याची आज आवश्यकता असल्याचे दाखवत नागरिकांचे प्रबोधन करीत आहे. या अगोदर ही बावरी परिवाराने पर्यावरण पूरक सजावट करून स्मार्ट ग्रीन सिटी व कोरोना योद्धा हे जनजागृतीपर देखावे साकारून सर्वांचे लक्ष ओढून घेतले होते. दरवर्षी चालू विषयांना हात घालत सर्व विषय समाजापर्यंत पोहचविण्यासाठी गणेशोत्सव मध्ये देखाव्याचा माध्यमातून समाजप्रबोधन करीत आहे. गणेशोत्सव 2021 देखावा वाहतूक नियम पाळा, जीवन सुरक्षित करा. या प्रेरणेतून साक्षात श्री गणेश स्वतः वाहतूक नियम पालन करण्याचे आवाहन करताना साकारण्यात आले आहे. ही संकल्पना पत्रकार करणसिंग रामसिंग बावरी यांनी पुढे घेऊन परिवारातील प्रीती बावरी, इंदिरा बावरी व भारत सदभैया यांच्या मदतीने साकारला आहे. हा देखावा पूर्ण पणे इकोफ्रेंडली असून कागद, पुठ्ठा, काडशीट, ग्लु व वाटर कलरचा उपयोग करू तयार केला आहे. यातील श्री गणेशाची मूर्ती स्वतःच्या हाताने प्रीती बावरी व इंदिरा बावरी यांनी घरी तयार केली आहे. म्हणून आज काळाची गरज समजून समाजाच्या प्रत्येक घटकाने वाहतूक नियमाचे पालन करणे खूप गरजेचे आहे. आम्ही आमच्या बावरी परिवाराच्या वतीने सर्व नागरिकांना व वाहन चालकांना नम्र निवेदन करतो की आपण वाहतूक नियम पाळूयात आपले जीवन सुरक्षित करूयात