विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
प्रत्येक युद्ध हे विशिष्ठ कारणासाठी लढल्याचा इतिहास आहे. एखाद्या देशाला शेजारच्या प्रदेशावर वर्चस्व मिळवायचे असते. तर एखाद्या राजालाच अनेक देश जिंकून सम्राट बनायचे असते. कारण काहीही असो, या युद्धांमुळे हजारो सैनिक आपला जीव गमावतात. परंतु सुमारे २३१ वर्षांपूर्वी, एक युद्ध अतिशय विचित्र कारणासाठी लढले गेले होते, ज्यात एकाच बाजूचे जवळजवळ १० हजार सैनिक ठार झाले होते. त्याला यादवी किंवा गृहयुद्ध असे नाव दिले जाते. कारण हे युद्ध दोन सैन्यदल एकमेकांविरूध्द लढत नव्हती. तर मद्यपान करून काही चुकांमुळे, एकाच बाजूच्या सैनिकांमध्ये चकमक झाली आणि त्यांनी एकमेकांना ठार मारले. या युद्धाला ‘बॅटल ऑफ कारंसिब्स’ म्हणून ओळखले जाते. तसेच काही लोक त्याला जगातील सर्वात हास्यास्पद युद्ध देखील म्हणतात.
इ.स. १७८८ रोजी सुमारे १ लाख ऑस्ट्रियन सैनिक कॅरॅन्सीबस शहर ताब्यात घेण्यासाठी निघाले होते. त्यावेळी ऑस्ट्रिया आणि तुर्की यांच्यातही युद्ध चालू होते. २१ सप्टेंबरच्या रात्री, ते सैन्य तिमिस नदीजवळ आले आणि त्यांनी सर्व बाजूंनी करँसीबला वेढले. त्यांना नदीच्या भोवती तुर्की सैन्य दिसले नाही, तर नदीच्या दुसऱ्या बाजूला रोमानी लोकांचा एक तंबू त्यांना दिसला.
जेव्हा ऑस्ट्रियन घोडदळ तेथे पोचले, तेव्हा रोमी लोकांनी त्यांना वाइन पिण्यास आमंत्रित केले. त्यातच ऑस्ट्रियाचे घोडदळ थकल्यामुळे नदीच्या काठी रोमानी लोकांबरोबर बसून मद्यपान करण्यास सुरुवात केली. त्याचदरम्यान काही ऑस्ट्रियन पायदळी सैनिक तेथे पोचले आणि त्यांनी घोडेस्वारांना मद्यपान करताना पाहिले आणि त्यांनीही मद्यपानासाठी वाईन मागितली. पण घोडेस्वारांनी त्यांना नकार दिला.
