शनिवार, ऑक्टोबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

असे आहे बारामतीचे भाजीपाला गुणवत्ता केंद्र… खरबूज लागवडीतून असा होतोय फायदा…

एप्रिल 10, 2023 | 5:09 am
in राज्य
0
5 1140x570 1

 

बारामती (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील कृषि विज्ञान केंद्रात अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून विविध भाजीपाला पिकांची लागवड करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून केंद्राने शेतकरी बांधवांची सध्याची अडचण दूर करण्यासाठी पॉलिहाऊसमध्ये बिगर हंगामी खरबूज या पिकाची लागवड करून चांगल्या प्रकारचे अर्थार्जन करण्यासाठी ‘हॅगींग’ खरबूज लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आहे. भाजीपाला गुणवत्ता केंद्रात नेदरलँडच्या शेती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निवडक पॉलिहाऊसधारक शेतकऱ्यांसाठी ‘मूल्य साखळी विकास कार्यशाळा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

पॉलीहाऊस खरबूज (हॅगींग) उत्पादन तंत्रज्ञान
खरबूज पिकाची लागवड पूर्वी फक्त नदीकडेच्या क्षेत्रात होत होती. मात्र आता या पिकाची लागवड व्यापारी तत्वावर पॉलीहाऊसमध्येही करण्यात येत आहे. पॉलीहाऊसमधील नियंत्रित वातावरणामध्ये वर्षभर लागवड करता येते. पिकाचा कीड व रोग यापासून चांगल्याप्रकारे संरक्षण करता येते. फळधारणा चांगल्या प्रकारे होते, तसेच पाणी आणि खत व्यवस्थापन उत्तम प्रकारे करता येते.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाने पुसा सरबती, हरामधू व दुर्गापुरा मधु या वाणांची लागवडीसाठी शिफारस केली आहे. पॉलीहाऊस मध्ये खरबूजाची लागवड करण्यासाठी नोन यु कंपनी या कंपनीचे मधुमती, अलीया, माधुरी-२ या वाणांची शिफारस केली आहे. पॉलीहाऊसमध्ये लागवड करताना उंच गादीवाफे तयार करून खरबूजाची लागवड केली जाते.
दोन गादीवाफ्यामधील अंतर ४ फुट आणि दोन रोपांमधील अंतर १.५ फुट ठेवावे. गादीवाफा उंची १.५ फुट व रुंदी २ फुट असावी. १० गुंठ्यामधील रोपांची संख्या २ हजार ४०० ते २ हजार ४५० इतकी असावी.

छाटणी व परागीभवन तंत्रज्ञान
मुख्य वेलीला येणाऱ्या बाजूच्या फांद्या वेळोवेळी काढणे अत्यंत गरजेचे असते. येणाऱ्या पहिल्या ७ ते १० पानानंतर पहिल्या फळांची फलधारणा करून घेणे गरजेचे आहे. परागीभवन योग्य वेळ सकाळी ९ ते ११ व सायंकाळी ४ ते ६ या कालावधीमध्ये करावे. एका वेळी शक्यतो एकच फळ ठेवावे. परागीभवन करत असताना वातावरणातील आदर्ता ८० टक्के असावी.

परागीभवन केल्यानंतर ५० ते ५५ दिवसांमध्ये खरबुजाचे फळ काढणीस तयार होते.फळ काढणीस आल्यानंतर रीफ्रॉक्टोमीटरच्या सहाय्याने यातील साखरेचे प्रमाण १४ ते १५ ब्रिक्स झाल्यानंतर याची काढणी करावी. प्रत्येक वेलीला साधारणतः १.५ ते २.० किलो पर्यंत फळांचे उत्पादन मिळते.

खरबूज पिकाचे पाणी व्यवस्थापन
खरबूज हे पिक अत्यंत जास्त पाण्याला बळी पडणारे पिक असून, यामध्ये पाण्याचे योग्य नियोजन खूप महत्त्वाचे आहे. ठिबक सिंचन या पद्धतीचा अवलंब करणे अतिशय गरजेचे असून शक्यतो ४ लिटर प्रति तास क्षमता असणारी डिप लाईनची निवड करावी. ढगाळ वातावरण असेल तर अतिशय कमी पाणी लागते. खरबुजाला फळधारणा तसेच फळ फुगवण कालावधीमध्ये जास्त पाणी लागते. २ ते ३ लिटर पाणी प्रति झाड प्रति दिन याप्रमाणे आपण पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे.

खरबूज पिकाचे खत व्यवस्थापन
प्रति हेक्टर २०० :१००: १०० नत्रः स्फुरद : पालाश प्रती हेक्टर द्यावे. नायट्रोजनची मात्रा लागवड करतेवेळी तसेच वाढीच्या अवस्थेमध्ये करावी. फॉस्परस करिता सिंगल सुपर फॉस्पेट या खताचा वापर करावा. पोटॅश हा घटकदेखील वाढीच्या सुरवातीपासून लागतो या प्रमाणे याचे नियोजन करावे. मायक्रोन्यूट्रियंट व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचाही संतुलित वापर करणे खूप महत्त्वाचे आहे. फळाला छेद जाऊ नये म्हणून सुरवातीपासून कॅल्शियम व बोरॉन या दोन्ही अन्नद्रव्यांचा संतुलित वापर करणे महत्त्वाचे असते.

काढणीपश्चात व्यवस्थापन
पक्व फळे काढल्यानंतर कोरोगेटेड बॉक्समध्ये फोमनेटच्या सहाय्याने पॅकिंग करून फळे विक्रीसाठी पाठविली जातात. प्रती वेल १.५ किलोपर्यंत फळे मिळतात. भाजीपाला गुणवत्ता केंद्रामध्ये पॉलीहाऊस मध्ये भारतीय पद्धतीने मातीमध्ये व डच पद्धतीने कोकोपीट यो बॅग्ज (हायड्रोपोनिक्स) या तंत्रज्ञानाचा वापर करून लागवड करण्यात आलेली आहे.

कोकोपीट मधील खरबूज लागवड
कोकोपीट हे मुख्य माध्यम वापरूनदेखील खरबूज लागवड करता येते. कोकोपीट हे पूर्णतः निर्जतुकीकरण केलेले असावे यामध्ये कोणत्याही बक्टेरिया अथवा बुरशीचा प्रादुर्भाव नसावा. याचा सुरवातीचा विद्युत वाहकता (ईसी) साधारणतः १ ते १०ms/cm व सामू हा ५.५ ते ६.५ पर्यंत असावा. तसेच सोडियमचे प्रमाण ९ टक्क्यापेक्षा कमी असावे. कोकोपीट हे लगेच सुकत असल्यामुळे यामध्ये सुरवातीला थोड्या प्रमाणात वर्मीक्यूलाईट या माध्यमाचा वापर करावा.

पाणी व्यवस्थापन करत असताना प्रति दिन १ ते २ लिटर प्रति चौ. मी या प्रमाणात व्यवस्थापन करावे. प्रत्येक बॅगला पाणी निचरा व्यवस्था असावी. खत व्यवस्थापन हे अतिशय सूक्ष्म पद्धतीने करावे लागते. यामध्ये विद्युत वाहकता व सामुचा आधार घेऊन सर्व खतांचे मिश्रण तयार करून वापरणे गरजेचे असते. पाणी व खते यामध्ये २५ टक्के बचत होते. कोकोपीट मधील खरबूज पिक ८ ते १० दिवस लवकर तयार होते. पुन्हा तेच माध्यम वापरून आपण लागवड करू शकतो.

कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पॉलीहाऊसमधील (हॅगींग) खरबूज लागवड केली जाते. पॉलीहाऊसमधून खरबुजाचे उत्पादन चांगले मिळते. या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणाची व्यवस्था केली आहे. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. तसेच शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून खरबुजाचे पीक घ्यावे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी भाजीपाला गुणवत्ता केंद्राला भेट द्यावी, असे आवाहन यशवंत जगदाळे (विषय विशेषज्ज्ञ उद्यानविद्या-भाजीपाला गुणवत्ता केंद्र) यांनी केले आहे.

Baramati Vegetable Quality Centre Musk Melon

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मंत्रालयाच्या कामकाजात होणार अमुलाग्र बदल; महाराष्ट्रदिनापासून होणार प्रारंभ

Next Post

शुभवार्ता! कर्करोग आणि हृदयविकारावरही येणार लस; लाखोंना दिलासा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

IMG 20251018 WA0011
महत्त्वाच्या बातम्या

कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी चिंचोंडी औद्योगिक वसाहतीत प्रकल्प…

ऑक्टोबर 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा दिवस… जाणून घ्या, १९ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 18, 2025
IMG 20251018 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकच्या सामन्यात… महाराष्ट्राचा सौराष्ट्र वर १० गडी राखून दणदणीत विजय…

ऑक्टोबर 18, 2025
tejas
महत्त्वाच्या बातम्या

शत्रूला धडकी भरवणारे असे आहे तेजस लढाऊ विमान… मेक इन इंडियाचा बोलबाला…

ऑक्टोबर 17, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर घरबसल्या खरेदी करा सोने आणि मिळवा १० लाखांपर्यंतचे बक्षिस….

ऑक्टोबर 17, 2025
NMC Nashik 1
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरातील २८ ठिकाणची एकत्रित पार्किंग निविदा वादात…

ऑक्टोबर 17, 2025
organ donation
महत्त्वाच्या बातम्या

भावनिक क्षण… आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण…

ऑक्टोबर 17, 2025
IMG 20251017 WA0049
मुख्य बातमी

ओझर येथील कार्यक्रमात ‘तेजस’ लढाऊ विमानासह प्रशिक्षणार्थी विमान राष्ट्राला समर्पित…

ऑक्टोबर 17, 2025
Next Post
vaccine

शुभवार्ता! कर्करोग आणि हृदयविकारावरही येणार लस; लाखोंना दिलासा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011