इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बारामतीमध्ये पहिल्यांदा पवार कुटुंबियांचा दिवाळी पाडवा वेगवेगळ्या ठिकाणी साजरा करण्यात आला. त्यानंतर भाऊबीजेला उपमुख्यमंत्री अजित पवार येतील असे वाटत होते. पण, त्यांनी रविवारी आपला प्रचार दौरा केला. त्यामुळे पवार कुटुंबियांनी अजित पवार विना गोविंद बागेत भाऊबीज साजरी केली. याचा एक व्हिडिओ खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यात म्हटले आहे की, बहिण-भावाच्या प्रेमाचा एक खास क्षण म्हणजे भाऊबीज! या निमित्ताने आज कुटुंबातील सर्व बहिणींनी मोठ्या उत्साहाने औक्षण केले. सर्वांना भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा!
परवा दिवाळी पाडवा शरद पवारांचा गोविंद बागेत तर काटेवाडीत अजित पवारांचा संपन्न झाला. दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. राष्ट्रवादीत फुट फडल्यानंतर त्याचे पडसाद पवार कुटुंबियांवरही पडले. लोकसभेत सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार एकमेकांविरुध्द उभ्या राहिल्या. त्यावेळेसही आरोप – प्रत्यारोप झाले. पण, या निवडणुकीनंतर पवार कुटुंबिय सण एकत्र साजरे करतील असे सर्वांना वाटत होते. पण, दिवाळी पाडवा पवार कुटुंबियांचा वेगवेगळा झाला. तर गोविंदबागेल झालेल्या भाऊबीजेला अजित पवार आले नाही.
विधानसभा निवडणुकीत बारामतीमधून अजित पवार विरुध्द त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार हे त्यांच्याविरुध्द उभे आहे. त्यामुळे पवार कुटुंबियांतील संघर्ष पुन्हा पेटला आहे. त्यामुळे सणातही हे कुटुंबिय एकत्र आले नाही.