सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बारामतीच्या कोरोना निर्बंधांचा फैसला २ दिवसात; अजित पवार यांची घोषणा

by India Darpan
जून 12, 2021 | 11:52 am
in राज्य
0
1 48 640x375 1

पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांच्या आत राहिल्यास निर्बंध आणखी शिथील करणार
बारामती –  बारामती शहरासह ग्रामीण भागात  कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही समाधानाची बाब असली तरी पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांच्या आत राहिला तरच निर्बंध आणखी  शिथील  केले जातील, प्रशासनाने पुढील दोन दिवसांनी परस्थिती पाहून निर्णय घ्यावा. यासाठी राज्य सरकारने ठरवून दिलेल्या निकषाचाही विचार केला जावा. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -19 विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, पंचायत समिती उपसभापती  रोहित कोकरे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, अपर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते,  उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओव्हाळ, पाटबंधारे विभागाचे  कार्यकारी अभियंता धोडपकर, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, रूई ग्रामीण रूग्णालयाचे डॉ. सुनिल दराडे, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गट नेता सचिन सातव आदींसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
x2 1.jpg.pagespeed.ic.YFaTg98ERX
बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना विषाणूसह, म्युकरमायकोसीसच्या प्रादुर्भावाची सद्यस्थिती, प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तसेच लसीकरण, ऑक्सिजन उपलब्धता, आरोग्य सुविधा आदी विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, बारामती शहरासह ग्रामीण भागात  कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे, ही समाधानाची बाब असली तरी पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांच्या आत राहिला तरच निर्बंध आणखी  शिथील  केले जातील. प्रसाशनाने पुढील दोन दिवसांनी परस्थिती पाहून निर्णय घ्यावा,  यासाठी राज्य सरकारने ठरवून दिलेल्या निकषाचाही विचार केला जावा.  संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन  आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज आहे.  कोरोना प्रतिबंधक लस जास्तीत जास्त उपलब्ध करण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे. लसीकरणाचे योग्य नियोजन करण्यात यावे. म्युकरमायकोसिसची लक्षणे, काळजी, उपचार यांची माहिती ग्रामीण भागात सर्वदूर पोहोचवावी. त्याबाबत जनजागृती करावी. तसेच म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी वापरण्यात येणा-या इंजेक्शनचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.  कोणत्याही परिस्थितीत कान, नाक, घसा तसेच इतर लक्षणे जाणवताच तातडीने रुग्णालयात जावून  नागरिकांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.  शासन व प्रशासनाच्या प्रयत्नांनी व नागरिकांच्या सहकार्याने बाधितांची संख्या घटली असली तरीही संसर्ग पुन्हा वाढू नये यासाठी प्रत्येकाने खबरदारी घ्यावी व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी  यावेळी केले.
उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तालुक्यामधील शहर व ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना तसेच संभाव्य संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी, ऑक्सिजन, म्युकरमायकोसिसच्या औषधांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
मोबाईल क्लिनिक व्हॅनचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते उद्घाटन
मा.हिराभाई बुटाला विचारमंच यांच्याकडून फिरता दवाखाना (मोबाईल क्लिनिक व्हॅन) चे उद्घाटन मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बुटाला विचारमंचाचे कौस्तुभ बुटाला आणि प्रतिभा हांडेकर हे उपस्थित होते. या फिरत्या दवाखान्यामार्फत बारामती शहरातील नागरिकांची  मोफत तपासणी करून औषधेही मोफत देण्यात येणार आहेत. तसेच दाना इंडिया टेक्निकल सेंटर प्रा.लि. हिंजवडी, पुणे यांच्या CSR फंडातून व मिलिंद वालवाडकर यांच्या प्रयत्नातून बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली शासकीय रूग्णालयास मिनी व्हेंटिलेटर (पोर्टेबल बायपास) देण्यात आले. त्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. दीपेश राव, अमेरिका यांच्याकडून म्युकर मायकोसिस साठी लागणाऱ्या इंजेक्शन चे 25 डोस  रुई ग्रामीण रुग्णालयास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाचरे मोरा! बघा, घराच्या छतावर नाचणाऱ्या मोराचा व्हायरल व्हिडिओ

Next Post

अनिल परब आणखी अडचणीत! केंद्रीय पथकाकडून रिसॉर्टची पाहणी

India Darpan

Next Post
anil parab

अनिल परब आणखी अडचणीत! केंद्रीय पथकाकडून रिसॉर्टची पाहणी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Screenshot 20250623 070829 Collage Maker GridArt 1

पंढरपूर सायकल वारी… ५००० हून अधिक सायकलस्वारांचा सहभाग, १० लाख किलोमीटरहून अधिक प्रवास

जून 23, 2025
Hydroponic4U163

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११.८८ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

जून 23, 2025
Gold1JIB2 e1750641367756

सोन्याच्या तस्करीप्रकरणी दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक….

जून 23, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक रिंगरोडला मंजुरी, त्र्यंबक सहापदरी, द्वारका सर्कलचा दोन टप्यात विकास….मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झाले हे निर्णय

जून 23, 2025
nashik3 1024x768 1

शेतकरी व नागरीकांना मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार…

जून 23, 2025
Untitled 58

अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणचा मोठा निर्णय…जगभरात तेलाच्या किंमती वाढणार

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011