देवळा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील मेशी येथील नवसाला पावणा-या पुरातन अशा जगदंबा देवीच्या दिवसापासून सुरु असलेल्या यात्रोत्सवाची अक्षयतृतीयेच्या दिवशी देवीची रथ मिरवणूक काढण्यात येऊन यात्रोत्सवाची सांगता करण्यात आली. यात्रोत्सवाची सांगता करतांना माणसांनी भरलेल्या बारा गाड्या ओढण्यात आल्या. यावेळी ५१ गोणी भंडारा, २१ गोणी कुंकु व ११ गोणी गुलालाची उधळण करीत गावक-यांनी व पंचक्रेशीतून आलेल्या भाविकांनी रथोत्सव व बारा गाड्या ओढण्याचा आनंद लुटला.