विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
सध्याच्या काळात कार्यबाहुल्यामुळे प्रत्येकालाच आर्थिक व्यवहार करण्यासाठी बँकेत जाणे किंवा एटीएम मध्ये जाणे शक्य होत नाही, त्यातच कोरोनाच्या संसर्गामुळे तर थेट बँकेच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करणे बहुतांश लोकांकडून टाळले जाते. सहाजिकच ऑनलाईन पद्धतीने आर्थिक व्यवहार करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परंतु आर्थिक व्यवहार करताना इंटरनेट आवश्यक असते. मात्र इंटरनेट शिवाय देखील पैसे ट्रान्सफर करता येणे आता शक्य झाले आहे.
सध्या प्रत्येकजण रोख पैशांऐवजी ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करणे पसंत करतो, कारण यामुळे वेळेची बचत होते. परंतु इंटरनेट कनेक्शन नसताना किंवा गती मंद असताना ऑनलाइन पेमेंट करणे कठीण होते. अशा परिस्थितीत, ग्राहक इंटरनेट कनेक्शनशिवाय देखील पेमेंट करू शकतात. कसे काय ते जाणून घेऊ या …
– इंटरनेटशिवाय पैसे कसे हस्तांतरित करण्याची पध्दत : पैसे ट्रान्सफर करण्यासाठी, प्रथम फोनच्या डायलर पॅडवर जा आणि *99#डायल करा, तेथे तुम्हाला बँकेचे नाव इथे टाकावे लागेल, आता तुमच्या समोर एक यादी दिसेल, ज्यात तुम्हाला पैसे पाठवण्याचा पर्याय मिळेल. पैसे पाठवण्याचा पर्याय निवडण्यासाठी नंबर, हे केल्यानंतर, हस्तांतरित करायची रक्कम प्रविष्ट करा, आता यूपीआय पिन प्रविष्ट केल्यानंतर, पाठवा बटणावर टॅप करा, यानंतर तुमचे पैसे हस्तांतरित केले जातील.
– विविध बँका मार्फत सेवा : इंटरनेट कनेक्शनशिवाय देखील पेमेंट करू शकता. कारण आतापर्यंत ही सेवा ५१ बँका आणि सर्व जीएसएम सेवा केंद्राद्वारे प्रदान केली जाते. याकरिता हिंदी आणि इंग्रजीसह 12 वेगवेगळ्या भाषांमध्ये वापरले जाऊ शकते.
– ग्राहकांसाठी सूचना तथा टीप: UPI पेमेंट ऑफलाईन करण्यासाठी, तुम्हाला आधी तुमच्या स्मार्टफोनवर BHIM, Paytm किंवा इतर कोणतेही UPI अॅप डाउनलोड करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. एकदा सिम कार्ड आणि स्मार्टफोन लिंक झाले की तुम्ही ऑफलाइन व्यवहार करू शकाल.
– सर्व सामान्य जनतेसाठी ई-रुपी लॉन्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये ई-रुपी लॉन्च केले. ही सेवा गिफ्ट व्हाउचरसारखे काम करते. ई-रुपी ( ई-आरयूपीआय ) ही एक प्रीपेड व्हाउचर सेवा आहे. या अंतर्गत योजनांचे पैसे थेट बँकेतून लाभार्थ्यांना पाठवले जातात. याचा अर्थ जर सरकार एलपीजी भरण्यासाठी ई-आरयूपीआय व्हाउचर पाठवेल, तर त्यातून फक्त गॅस सिलेंडर भरता येईल. परंतु ही सेवा सुरू झाल्यानंतर, लाभार्थ्यांना रोख स्वरूपात पैसे पाठवले जाणार नाहीत.