मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या चार दिवसांपासून सलग सुट्या असल्यामुळे बँक ग्राहकांची अनेक कामे रेंगाळली आहेत. याची दखल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतली आहे. म्हणूनच सोमवारपासून (१८ एप्रिल) बँकांच्या वेळेत रिझर्व्ह बँकेने बदल करण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उद्यापासून बँकांचे कामकाज एक तास अधिक चालणार आहे. कोरोना संकटामुळे बँकांच्या वेळात बदल करण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा पूर्वीप्रमाणेच बँकांच्या वेळा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार बँका आता सकाळी ९ वाजता उघडणार आहेत. म्हणजेच, सकाळी ९ वाजता बँकेचे कामकाज सुरू होणार आहे. त्यामुळे सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत बँकांचे कामकाज सुरू राहणार आहे. परिणामी, ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.