इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शेअर बाजारातील गुंतवणूक हा संयमाचा खेळ आहे. संयमाने गुंतवणूक करणे म्हणजे दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक करणे. जर तुम्हाला खरोखरच शेअर बाजारातून प्रचंड पैसा कमवायचा असेल तर शेअर विकत घेताना तो दीर्घकालीन विचार करूनच विकत घेतला पाहिजे.
शेअर विकत घेऊन काही दिवसात विकून तुम्ही काही नफा कमावू शकाल मात्र त्यातून संपत्ती निर्माण होणार नाही. विकत घ्या, थांबा आणि विसरा याच तत्त्वानुसार किंवा धोरणानुसार गुंतवणूक केल्यास चक्रवाढवृद्धीचा फायदा होत तुमची गुंतवणूक कित्येक पटींनी वाढते. जे शेअर्स असे कित्येक पटींनी गुंतवणूक वाढवतात त्यांना मल्टीबॅगर शेअर म्हणतात. असाच एक शेअर कोटक महिंद्रा बॅंकेचा आहे,
कारण कोटक ही देशातील आघाडीची बॅंक आहे.
या शेअरमधील तेजी लक्षात घेता कंपनी स्टॉकने अल्पावधीत व्यापक बाजारपेठेला मागे टाकणे अपेक्षित आहे. त्याच्या भक्कम मूल्यगतीसह हा शेअर तेजीतील व्यवहारासाठी उत्तम संधी उपलब्ध करून देतात. यामध्ये अल्प ते मध्यम मुदतीसाठी आणि त्यापुढील टप्पा गाठण्याची क्षमता आहे. हा शेअर तांत्रिकदृष्ट्या मजबूत आहे आणि बाजारात नकारात्मक भावना असूनही उतरणीपेक्षा गुंतवणूकदारांनी वरच्या बाजूवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्या अगोदर अनुभवी गुंतवणूकदार कंपनीचं व्हॅल्यूएशन नक्की पाहतो. सध्याच्या काळात तर गुंतवणूकदार व्हॅल्यूएशनच्या बाबतीत खूपच सतर्क झाले आहे, कारण अनेक स्टार्टअप्स तोंडघशी पडले आहेत. बाजारात लिस्ट होताना स्टार्टअप्सच्या शेअर्सचे खूप जास्त व्हॅल्यूएशन होते.
आता स्टार्टअप्सचे शेअर्स खरेदी करण्यास कुणीही धजावत नाहीत. त्यामुळेच गुंतवणूकदार सतर्क झालेत. मात्र, एक प्रश्न नेहमी मनात येत असतो.शेअरची व्हॅल्यूएशन खूप जास्त असूनही जबदरस्त परतावा मिळत असेल तर? बँकिंग क्षेत्रातील असाच एक शेअर्स आहे, बँकेचं नाव आहे कोटक बँक इतर बँकेच्या तुलनेत कोटक बँकेचं व्हॅल्यूएशन खूप जास्त आहे.
कोणत्याही तुलनेत कोटकची प्राईस टू बुक व्हॅल्यू 3.67 पट आहे. कोटकच्या तुलनेत HDFC बँक 3.06 पट,ICICI बँक 2.93 आणि अॅक्सिस बँक 1.72 पटीनं व्हॅल्यूएशनवर सध्या ट्रेड करत आहेत. तर आता प्रश्न असा आहे की जास्त व्हॅल्यूएशन असूनही कोटक बँकेमध्ये परतावा देण्याची क्षमता आहे .NIM ची म्हणजे नेट इंटरेस्ट मार्जिन म्हणजे व्याजावर बँकेला किती मार्जिन मिळत आहे. इतर दिग्गज बँकेच्या तुलनेत कोटक बँकेचा NIM सर्वाधिक आहे. म्हणजे बँक व्याजाद्वारे बक्कळ कमाई करत आहे.फक्त एवढंच नाही की कोटक बँकेचं NIM सरासरीपेक्षा जास्त आहे. कोटक बँकेला गेल्या काही वर्षांपासून जास्त NIM चा मोठा फायदाही होत आहे.
विशेष म्हणजे रिर्टन ऑन अॅसेटच्या बाबतीतही कोटक बँक सगळ्यात पुढं आहे.आता कर्जाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास कोटक बँक सर्वाधिक मजबूत बँक आहे. म्हणजेच सर्वच महत्त्वाच्या घटकांच्या बाबतीत इतर दिग्गज बँकेच्या तुलनेत कोटक बँक मजबूत असल्याचं दिसून येतंय.बँकिंग व्यवसायातील इतर घटक, उदाहरणार्थ CASA रेशिओ, अनुत्पादक कर्ज म्हणजेच NPA रेशिओ च्या बाबतीत बँकेनं सतत चांगली कामगिरी केली आहे कोटक बँकेचा कासा रेशिओ स्थिर आहे.
बँकेनं अनुत्पादक कर्ज कमी करण्यावर जोर दिला, एवढंच नव्हे तर वार्षिक निकाल पाहिल्यास कोटक बँकेचा नफ्यातील वाढ 23 टक्क्यांवर पोहचल्याचं दिसून येते, कोटक बँकेचं व्हॅल्यूएशन जास्त असण्याचे मुख्य दोन कारणं आहेत. एक म्हणजे सतत सर्वोत्तम कामगिरी केली. 2001 पासून कोटक बँकेनं गुंतवणूकदारांना आतापर्यंत 745 पट रिटर्न दिला. सध्याच्या परिस्थितीत कोटक बँकेच्या शेअर्समध्येही घसरण झालीये. 52 आठवड्याच्या उच्चांकाची तुलना करता 20 टक्क्यानं कमी आहे.गोल्डमन सॅचनुसार गेल्या दोन वर्षात कोटक बँकेची कामगिरी ही बँक निफ्टीपेक्षा चांगली आहे.
2027 या आर्थिक वर्षापर्यंत कोटक बँकेच्या एकूण शेअर्सची किंमत म्हणजेच मार्केट कॅप 42 अब्ज डॉलर आहे. मार्केट कॅप 100 अब्ज डॉलर होणार असल्याचा अंदाजही गोल्डमन सॅचनं वर्तवलाय. म्हणजेच पुढील पाच वर्षात मार्केट कॅप दुप्पटीहून अधिक वाढण्याचा अंदाज आहे.बजाज फायनान्स,SBI Card सारख्या महाग शेअर्सची तुलना केल्यास कोटक बँकेचा शेअर जवळपास 30 टक्के डिस्काऊंटवर मिळत आहे.व्याज दर वाढत असतानाही कोटक बँक फायदा घेण्याच्या स्थितीत असल्याचं ब्रोकरेज हाऊसेसचं म्हणणे आहे.
(महत्त्वाची सूचना – शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे अत्यंत जोखमीचे आहे. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)
Bank Share Return Investment Rupees Money
Share Market BSE Kotak Mahindra