सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बँक आणि पोस्ट ऑफिसने बदलला हा नियम; व्यवहारासाठी आता हे सक्तीचे

by India Darpan
मे 15, 2022 | 4:44 pm
in राज्य
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुम्ही जर बँक किंवा पोस्टात व्यवहार करण्यासाठी जात असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे वृत्त आहे. कारण, बँक आणि पोस्टाचे काही नियम बदलले आहेत. ते तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. खासकरुन आर्थिक व्यवहारासाठी आता एक बाब सक्तीची झाली आहे. केंद्र सरकारने बँकेतून पैशांच्या व्यवहाराशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. याअंतर्गत आता बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून विहित मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी पॅन आणि आधार कार्डची माहिती देणे बंधनकारक असेल.

एखाद्या ग्राहकाने आर्थिक वर्षात 20 लाख रुपये रोख काढले किंवा जमा केले तर आता बँक अधिकाऱ्याला पॅन किंवा आधार कार्ड दाखवणे बंधनकारक असेल. त्यानंतर बँक हे दस्तऐवज आयकर विभागाकडे पाठवेल. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. रोखीच्या व्यवहारांचा मागोवा घेणे हा त्यामागील सरकारचा उद्देश आहे.

विशेष म्हणजे हा नियम फक्त बँका किंवा पोस्ट ऑफिसला लागू होणार नाही, तर सहकारी संस्थांनाही लागू असेल. यासोबतच नवीन चालू खाते उघडल्यास त्यासाठीही पॅन अनिवार्य करण्यात आले आहे. या नव्या नियमांतर्गत अर्थव्यवस्थेतील रोख रक्कम रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. वार्षिक स्टेटमेंट (AIS) आणि TDS च्या कलम 194N द्वारे सरकारद्वारे याचा आधीच मागोवा घेतला जात आहे. त्यामुळे आता ग्राहकांचे रोखीचे व्यवहार अगदी सहज शोधता येतील.

तथापि, या वर्षी पॅन किंवा आधार आवश्यक असेल, मात्र मागील वर्षी रोख जमा करणे किंवा काढणे यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. मात्र, हा नियम एका दिवसात 50 हजार रुपये काढणे किंवा जमा केल्यावर नक्कीच लागू होता. वास्तविक, आतापर्यंत पॅन कार्ड असलेल्या व्यक्ती 50 हजारांपेक्षा कमी रक्कम काढू किंवा जमा करू शकत होते. तसेच तेव्हा आधारही यासाठी वैध नव्हता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोकड इकडून तिकडे नेण्यात आली.

अर्थ तज्ज्ञांचे मत आहे की, नोटाबंदीनंतरही छोटे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहेत आणि त्याचा माग काढणे सरकारसाठी सोपे नव्हते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात करचोरी झाली. पण आता नवीन नियमानुसार, 1 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांचा मागोवा घेतला जाऊ शकतो, त्यामुळे सरकारला करचोरी शोधणे सोपे होईल. त्यासाठी केंद्र सरकारने आधीच तयारी केली होती.

वास्तविक, सरकारने पॅन आणि आधार कार्ड लिंक केले आहे. त्यामुळे या व्यवहारासाठी पॅनऐवजी आधार कार्डही वैध असेल. सरकारने आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी 31मार्च 2022 पर्यंत वेळ दिला होता. आता लिंक केल्यास 500 रुपये द्यावे लागतील. तसेच 1 जुलै नंतर 1,000 आणि पॅन कार्ड मार्च 2023 नंतर निष्क्रिय केले जाईल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ऐतिहासिक! भारतीय बॅडमिंटन संघाने पहिल्यांदाच जिंकला थॉमस कप; १ कोटींचे बक्षिस जाहीर

Next Post

नाशिक – एकाच दिवशी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात तीन जण ठार

India Darpan

Next Post
accident

नाशिक - एकाच दिवशी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात तीन जण ठार

ताज्या बातम्या

jilha parishad

रणधुमाळी जिल्हा परिषदेची….नाशिक जिल्ह्यात कॉंग्रेसची सदस्यसंख्या आणखी कितीने घटणार ?

जून 23, 2025
Screenshot 20250623 130005 Collage Maker GridArt

नगरसुल रेल्वे स्थानकावर नंदिग्राम, जनशताब्दी, तपोवन एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी…

जून 23, 2025
Untitled 76

हे माजी पंतप्रधान स्वतःचे सामान घेऊन ट्रेनमधून जेव्हा बाहेर उतरतात…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 23, 2025
Screenshot 20250623 115337 Collage Maker GridArt

राजकारणाचा खेळखंडोबा….नाशिकमध्ये मंत्री अस्वस्थ, आमदार व्यस्त, अधिकारी व नागरिक त्रस्त तर विरोधक सुस्त…

जून 23, 2025
IMG 20250621 WA0253 1

पंतप्रधान श्री केंद्रीय विद्यालय क्र. १ देवळाली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

जून 23, 2025
Untitled 75

नाशकात ही कंपनी करणार कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक…

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011