इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू नमन ओझा यांचे वडील व्हीके ओझा यांना मुलताई पोलिसांनी अटक केली आहे. ओझा यांनी २०१३ साली बँक ऑफ महाराष्ट्रच्या जौलखेडा शाखेत बनावट खाते उघडून किसान क्रेडिट कार्डमधून सुमारे १.२५ कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एफआयआर दाखल झाल्यापासून तो फरार होते.
जौलखेडा येथील बँकेचे शाखा व्यवस्थापक असताना त्यांच्या सहकाऱ्यांसह ओझा यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मुलताई पोलीस ठाण्यात सन २०१३ मध्ये आयपीसीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना मुलताई पोलिसांनी सोमवारी अटक करून न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले, तेथून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुलताई पोलीस ठाण्याचे प्रभारी सुनील लता यांनी अटकेविषयी माहिती देताना सांगितले की, “पोलीस व्हीके ओझाचा शोध घेत आहेत. त्यांच्यावर आयपीसीच्या कलम ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, १२०बी, ३४ आणि आयटी कायद्याच्या कलम ६५,६६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील इतर सर्व आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.” अभिषेक रत्नम नावाचा व्यक्ती २०१३ मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या जौलखेडा येथे शाखा व्यवस्थापक म्हणून नियुक्त झाला होता. त्याने इतरांच्या मदतीने बँकेतून कर्ज घेण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. नंतर त्यांची बदली झाली.
दरम्यान, २ जून २०१३ रोजी, सुमारे ३४ बनावट खाती उघडण्यात आली आणि KCC कर्ज खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आली आणि १.२५ कोटी रुपये त्यातून काढण्यात आले. हा घोटाळा झाला तेव्हा व्ही के ओझा यांची शाखा व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या गुन्ह्यात अन्य काही बँक कर्मचाऱ्यांचाही सहभाग होता.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये नमन ओझा हे मोठे नाव आहे. मात्र, महेंद्रसिंग धोनी आणि ऋद्धिमान साहासारख्या विकेट किपर्समुळे त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारशा संधी मिळाल्या नाहीत. तो फक्त एक वनडे आणि एक कसोटी आणि दोन टी-२० सामने खेळू शकला. त्याने आयपीएलमध्ये तीन संघांचे प्रतिनिधित्व केले. फेब्रुवारी २०२१ मध्ये नमन ओझाने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
MP | In 2014, a case of alleged fund embezzlement in Bank of Maharashtra’s branch in Betul was registered. The then bank manager VK Ojha, father of former Indian cricketer Naman Ojha, was arrested yesterday. All other accused were arrested earlier: Sunil Lata, Multai PS in-charge pic.twitter.com/eFzACsTP2s
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) June 7, 2022