नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोणतीही स्टॅम्प ड्युटी नाही, त्वरीत कर्ज मंजुरी असणारा बँक ऑफ महाराष्ट्र व्दारका शाखेची सोने तारण कर्ज योजना चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. सर्वात कमी व्याज दर असल्यामुळे या योजनेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती बँक व्यवस्थापक यांनी दिली.
शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार व इतर सर्व नागरिकांसाठी ही योजना फायदेशीर आहे. या योजनेची कर्ज मर्यादा १ कोटी रुपयापर्यंत आहे. कृषी कर्जास सातबारा उतारा, पॅन कार्ड झेरॅाक्स, आधार कार्ड झेरॅाक्स व एक फोटो लागतात. तर रिटेल कर्जास पॅन कार्ड झेरॅाक्स, आधार कार्ड झेरॅाक्स व एक फोटो इतक्याच कागदांची आवश्यकता आहे.
या योजनेत कृषी सोने तारण कर्जास ८.६० टक्के व्याज तर रिटेल सोने तारण कर्जास ९.३० टक्के व्याज आहे. या योजनेतून कर्ज हवे असल्यास बँक ऑफ महाराष्ट्र व्दारका शाखा, मोबाईल नंबर – ९२०९०५५०१६ येथे संपर्क साधावा.