पुणे – बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती करण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांना नोकरीची संधी प्राप्त होणार आहे. विशेष म्हणजे आठवी ते दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना देखील या बँकेत नोकरीची संधी मिळू शकते यासाठी अर्ज कसा करावा हे जाणून घेणे आवश्यक आहे.
बँक ऑफ इंडियाने लखनौ झोनमध्ये 8 वी, 10 वी आणि पोस्ट ग्रॅज्युएट पास उमेदवारांच्या पदांसाठी फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, ऑफिस अटेंडंट, गार्डनर आणि कौन्सिलर या पदांसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी इच्छुक असलेले उमेदवार 15 नोव्हेंबर 2021 पूर्वी या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट bankofindia.co.in ला भेट देणे आवश्यक आहे. कार्यक्षम तसेच इयता ८ ते १० पास तरूणांना नोकरी मिळते.
पगार असा मिळेल
शिकाऊ ऑफिसर – 20 हजार रुपये,
ऑफिस असिस्टंट – 10 हजार रुपये,
ऑफिस अटेंडंट – 8 हजार रुपये,
वॉचमन कम गार्डनर – 6 हजार रुपये,
आर्थिक साक्षरता समुपदेशक – 18 हजार रुपये असे आहे.
सदर पदासाठी पात्रता अशी
शिकाऊ उमेदवार (विद्याशाखा)- व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये पदवी आणि पदविका असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. उमेदवाराला संगणकचे ज्ञान असावे. तर ऑफिस असिस्टंट- संगणकाच्या मूलभूत ज्ञानासह पदवी आवश्यक. ऑफिस अटेंडंट – 10वी पास, वॉचमन कम गार्डनर – आठवी पास.
आर्थिक साक्षरता समुपदेशक: UGC द्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आणि पदव्युत्तर पदवी असावी. वय मर्यादा : शिकाऊ उमेदवार (विद्याशाखा ) – 25 ते 63 वर्षे, ऑफिस असिस्टंट – 18 ते 43 वर्षे, ऑफिस अटेंडंट 18 ते 63 वर्षे, वॉचमन कम गार्डनर – 18 ते 63 वर्षे, आर्थिक साक्षरता सल्लागार – 62 वर्षांपर्यंत निवड प्रक्रिया, निवड लेखी चाचणी आणि मुलाखतीवर आधारित असेल.