पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदाने विविध विभागांमध्ये एकूण १०५ पदांच्या भरतीसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. बँकेने प्रसिद्ध केलेल्या भरतीच्या जाहिरातीमध्ये, फसवणूक जोखीम व्यवस्थापन, MSME आणि कॉर्पोरेट क्रेडिट विभागातील व्यवस्थापक आणि अधिकारी या पदांसाठी ही भरती करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या सर्व पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार आजपासून बँकेच्या अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ मार्च २०२२ आहे.
याप्रमाणे अर्ज करा
– ज्या उमेदवारांनी बँक ऑफ बडोदा भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी बँकेच्या वेबसाइटवर करिअर विभागात जाऊन अर्ज करायचा आहे. तिथे संबंधित ऑनलाइन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
– उमेदवारांनी प्रथम त्यांच्या ईमेल, मोबाईल नंबर आणि इतर तपशीलांद्वारे नोंदणी करावी लागेल.
– यानंतर, दिलेला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉग इन करून अर्ज सबमिट करावा लागेल.
– अर्जादरम्यान, उमेदवारांना ६०० रुपये शुल्क भरावे लागेल, जे ते ऑनलाइन भरू शकतात.
– अनुसूचित जाती/जमाती/दिव्यांग/महिला उमेदवारांसाठी, फी १०० रुपये भरावी लागेल.
या पदांवर होणार भरती
व्यवस्थापक (डिजिटल फ्रॉड) (फसवणूक जोखीम व्यवस्थापन) – १५ पदे
क्रेडिट ऑफिसर (MSME विभाग) – ४० पदे
क्रेडिट एक्सपोर्ट/इम्पोर्ट बिझनेस (MSME विभाग) – २० पदे
परकीय चलन संपादन आणि संबंध व्यवस्थापक (कॉर्पोरेट क्रेडिट विभाग) – ३० पदे