इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तुम्ही जर सरकारी किंवा बँकेत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. बँक ऑफ बडोदा (BOB) ने शेकडो स्पेशलिस्ट ऑफिसरच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया केवळ ऑनलाइन असेल. या भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणारे सर्व उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या bankofbaroda.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या भरतीची माहिती जाणून घेऊ या …
बँक ऑफ बडोदा स्पेशालिस्ट ऑफिसर भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. संस्थेत अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 जुलै 2022 आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी त्यांचे अर्ज पूर्ण करावेत. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना 600 रुपये जमा करावे लागतील. त्याच वेळी, SC, ST, महिला आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फी म्हणून 100 रुपये जमा करावे लागतील.
बँक ऑफ बडोदा मध्ये जाहीर झालेल्या भरतीसाठी एकूण 325 रिक्त जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यापैकी, 75 रिलेशनशिप मॅनेजर SMG/SIV साठी, 100 रिलेशनशिप मॅनेजर MMG/SIII साठी, 100 क्रेडिट अॅनालिस्ट MMG/SIII साठी आणि 50 क्रेडिट अॅनालिस्ट MMG/SII साठी आहेत. उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा GD/मुलाखत द्वारे केली जाईल.
– रिलेशनशिप मॅनेजर: ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री किंवा फायनान्समधील स्पेशलायझेशनसह एक वर्षाचा डिप्लोमा.
– क्रेडिट विश्लेषक (MMG/SIII): वित्त किंवा CA/CMA/CS/CFA या विषयातील विशेषीकरणासह पदवी आणि पदव्युत्तर पदवी.
– क्रेडिट विश्लेषक (MMG/SII): पदवी आणि CA.
– सर्वप्रथम www.bankofbaroda.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
– आता मेनपेज तथा मुख्यपृष्ठावर दिसणार्या वर्तमान संधींच्या विभागात जा.
– आता संबंधित भरतीसाठी अर्ज ऑनलाइन लिंकवर क्लिक करा.
– आता अर्ज भरा.
– अर्ज फी भरा आणि सबमिट करा.
– अर्ज डाऊनलोड करा आणि पुढील गरजांसाठी प्रिंट आउट घ्या.
Bank Of Baroda Job Opportunity Recruitment Vacancy