मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोणत्याही बँकेत खाते उघडल्यावर पैशाचे व्यवहार करताना त्या बँकेत किमान रक्कम शिल्लक ठेवणे आवश्यक ठरते. पूर्वीच्या काळी बँकेत किमान शंभर रुपये शिल्लक ठेवल्यास ठेवता येत होते, परंतु कालांतराने अनेक बँकांनी सदर किमान शिल्लक रकमेमध्ये वाढ केल्याने ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत होती. परंतु तरीही ग्राहकांना ही वाढीव रक्कम बँकेत शिल्लक ठेवणे बंधनकारक ठरले होते.
अनेक बँकांमध्ये सुमारे पाचशे ते हजार रुपये किमान बॅलन्स ठेवणे बॅलन्स रक्कम ठेवणे आवश्यक ठरते. परंतु सरकारने आता हा नियम बदलण्याचे ठरविले असून त्या संदर्भात लवकरच कायदा करण्यात येईल, असे अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी म्हटले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील विविध आर्थिक योजना बाबत अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी अर्थ राज्यमंत्री केंद्रशासित प्रदेशाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बँकांबाबत मत व्यक्त केले. यापुढे ग्राहकांना बँक खात्यात किमान रक्कम ठेवण्याची गरजही भासणार नाही. वेगवेगळ्या बँकांच्या बचत आणि चालू खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवण्याची मर्यादा वेगवेगळी असते.
महत्वाचे म्हणजे गेल्या काही दिवसांत केंद्राकडे जन-धन खाती उघडण्याच्या मोहिमेदरम्यान देशातील प्रत्येक नागरिकाचे बँक खाते असावे, यासाठी प्रयत्न करण्यात आले. जन धन खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची सक्ती नाही. खात्यातील किमान शिल्लक ठेवण्याबाबत भागवत कराड यांनी सूचक वक्तव्य केले आहे. यापुढे बँकांचे संचालक मंडळ किमान शिल्लक न ठेवणाऱ्या खात्यांवरील दंड माफ करण्याचा निर्णय घेऊ शकतात, असेही कराड म्हणाले. कराड यांना किमान बॅलन्स मेंटेन करण्याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी या संदर्भात मत व्यक्त केले तसेच जम्मू-काश्मीरमधील बँकांनी गेल्या काही वर्षांत चांगले काम केले आहे. तसेच बँकांना काही गोष्टींवर आपली कामगिरी सुधारण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले.
Bank Minimum Balance Rule Union Minister