इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बँकेत जाणाऱ्या ग्राहकांसाठी देखील ड्रेसकोड असतो का? कॅनरा बँकेच्या एका ब्रँच मॅनेजरने हाफ पँट घालून येणाऱ्या पुरुषांना बँकेत प्रवेश नसल्याची नोटीस लावली आणि याची चर्चा होऊ लागली आहे. उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. आणखी धक्कादायक म्हणजे एसबीआयच्या ग्राहकाला देखील जानेवारीमध्ये बँकेने फुल पँट घालून ये असे सांगत माघारी पाठविले होते. त्यामुळे बँकेच जाण्यासाठी काही ड्रेसकोड असतो का, याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
बँकेच्या शाखा व्यवस्थापक अर्चना कुमारी यांनी नोटीस लावली आहे. यामध्ये बँकेचे काही ग्राहक तरुण असून ते हाफ पँट घालून बँकेत येतात. बँकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी या हाफ पँटवाल्या तरुणांमुळे लक्ष विचलित होत असल्याची लेखी तक्रार केली आहे. त्यामुळे त्यांना काम करणे अवघड होते, असे त्या तक्रारीत नमूद करण्यात आल्याचे कुमारी यांनी म्हटले आहे. त्यामुळेच बँक मॅनेजरने हाफ पँटमध्ये येऊ नका, अशी नोटीस बजावली आहे.
याबाबत ग्राहकांचे अधिकार काय? याबाबत वकीलांचे म्हणणे आहे की, बिकिनी किंवा अंडरगारमेंट्स वगळता ग्राहक त्यांना हवे ते कपडे घालू शकतात. मात्र यात नग्नता नसावी, अशा परिस्थितीत ग्राहकांवर कायदेशीर कारवाईही होऊ शकते. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती कपडे न घालता किंवा खूपच कमी कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी जात असेल तर त्याला नग्नता म्हणतात. असे केल्यास कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. यामध्ये कोणत्याही व्यक्तीला तीन महिन्यांपर्यंतच्या तुरुंगवासाची किंवा दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.
खरे म्हणजे बँक ही ग्राहकांसाठी बनवली आहे. ग्राहक बँकेसाठी बनलेले नाहीत. त्यामुळे कपड्यांबाबत नोटीस जारी करणे म्हणजे तुम्ही ग्राहकांना बँकेत येण्यास बंदी घालत आहात. ग्राहक बँकेत येतोय की नाही याचा बँकेला फरक पडत नाही, मात्र हे चुकीचे आहे. तरीही शाखा व्यवस्थापकाने हाफ पँट घालून येऊ नका, अशी नोटीस बजावली आहे.
फार तर शाखा व्यवस्थापक हे बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर त्यांचे निर्णय लादू शकतात. ग्राहकांवर नाही, असे सोशल मिडियात पोस्टद्वारे सांगितले जात आहे. बँक व्यवस्थापक केवळ ग्राहकांच्या प्रवेशावर बंदी घालू शकतात. याविरोधात ग्राहक बँकेच्या वरिष्ठांकडे तक्रार करू शकतो. त्यावर काही कार्यवाही झाली नाही तर ते झोनल ऑफिसरकडे लेखी तक्रार करू शकतात. तसेच कोणतीही बँक आपल्या ग्राहकांना लंच टाईमच्या नावाखाली थांबवू शकत नाही. तसेच हे कर्मचारी एकाच वेळी जेवणासाठी जाऊ शकत नाहीत. तरी देखील बँक कर्मचारी मनमानी करत असतात, असे काही ग्राहकांचे म्हणणे आहे.
Bank Manager Notice Dress Code Rules Half Pant