इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अनेकदा आपल्या जवळच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना अर्जंट पैशांची गरज असते. त्यामुळे ते बँकेकडून कर्ज घेतात. कर्ज घेताना बँक त्यांचा सर्व तपशील तपासते. जसे की संबंधित व्यक्तीचा सीबील स्कोर, त्याची सॅलरी किती आहे. त्याने आधी काही कर्ज घेतले आहे का? तो नियमित आयटीआर भरतो का? अशा सर्व गोष्टी चेक केल्या जातात आणि मगच त्याला कर्ज मंजूर केले जाते. मात्र कर्ज मंजूर करताना बँकेला दोन गॅरंटरची देखील आवश्यकता असते. समजा कोणत्याही कारणाने संबंधित व्यक्तीने कर्जाची परतफेड केली नाही तर त्या कर्जाची जबाबदारी ही गॅरंटरची असते. कर्जाबाबत बँक गॅरंटरकडे चौकशी करू शकते. अनेकदा आपल्यावर देखील एखाद्या नातेवाईकांसाठी किंवा मित्रासाठी गॅरंटर राहण्याची वेळ येते.
एखाद्या व्यक्तीला बँकेतून लोन घ्यायचे असेल तर त्याला गॅरंटची आवश्यकता असते. हमीदार असल्याशिवाय कोणत्याही बँकेतून लोन मिळत नाही. मग कर्जाची आवश्यकता असलेल्या व्यक्तींकडून गॅरंटरचा शोध घेतला जातो. मात्र हमीदार होण्यासाठी किंवा कोणाच्या कर्जाची हमी घेण्यासाठी अनेक नियमांचे पालन करावे लागते. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या कर्ज परतफेडीची हमी घेणार असाल तर तुम्हाला देखील अनेक कागदपत्रांवर सह्या कराव्या लागतात.
अनेकांना गॅरटंर होणे म्हणजे एक औपचारिकता वाटत असते. परंतु जर कर्ज घेणाऱ्या व्यक्तीने कर्जाची परतफेड न केल्यास तुम्हाला देखील कर्जदाता बँकेची नोटीस येऊ शकते. त्यामुळे कोणाच्या कर्जाची हमी घेण्यापूर्वी त्याबाबतचे सर्व नियम समजून घेणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
बँक किंवा कोणतीही वित्तासंस्था कोणत्याही व्यक्तीला गॅरंटरशिवाय कर्ज देत नाही. त्यामुळे गॅरंटवर मोठी जबाबदारी असते. जर कर्ज घेणाऱ्याने कर्जाची परतफेड न केल्यास गॅरंटरला बँकेच्या वतीने नोटीस पाठवली जाते आणि कर्जाची परतफेड करण्यात सांगितले जाते. अशा स्थितीमध्ये गॅरंटरला कर्जाची परतफेड करावी लागते.
कोणतीही बँक किंवा वित्तसंस्था गॅरंटरशिवाय कर्ज देत नाही. एखाद्या कर्जाची गॅरंटी घेणे म्हणजे त्या व्यक्तीसोबत तुम्ही देखील बँकेचे कर्जदार असल्यासारखे आहात. जर कर्जदाराने कर्जाची परतफेड केली नाही तर बँकेच्या वतीने गॅरंटकडून कर्जाची वसुली केली जाते. त्यासाठी रितसर गॅरंटला नोटीस पाठवण्यात येते. या परिस्थितीमध्ये जर संबंधित व्यक्तीने कर्ज भरले नाही तर बँक तुमच्याकडे विचारणा करू शकते. मात्र अशा परिस्थितीमध्ये घाबरून न जाता तुम्ही बँकेत जाऊन रितसर स्वता:ची गॅरंटरमधून सुटका करून घेऊ शकता. त्यासाठी नेमकं काय करावे लागते हेच आपण जाणून घेणे आवश्यक आहे.
जर एखाद्या मित्रासाठी किंवा नातेवाईकाच्या कर्जासाठी गॅरंटर बनला असाल आणि त्याने कर्ज भरण्यास टाळाटाळ केली तर अशा परिस्थितीमध्ये बँक गॅरंटरला जबाबदार धरते. मात्र अशा परिस्थितीमध्ये घाबरून जाऊ नका. अशा वेळी तुम्ही बँकेत जाऊन रितसर अर्ज करू शकता. बँकेला आपण गॅरंटर राहू इच्छित नाही असे सांगा. तसा अर्ज बँकेकडे सादर केल्यास तुमची या प्रकरणातून सुटका होऊ शकते. अशावेळी कर्जदार व्यक्तीला बँक गॅरंटर म्हणून दुसरा व्यक्ती शोधण्याचा सल्ला देते.
जर परदेशात नोकरी लागली असेल, तरी देखील तुम्ही गॅरंटरमधून तुमची सुटका करू शकता. तुम्हाला परदेशात नोकरी लागली आहे, याबाबतची माहिती संबंधित बँकेला द्या. तुमच्या नोकरीसंदर्भातील कागदपत्रे बँकेत सादर करा. आणि गॅरंटरमधून नाव काढून टाकण्याची विनंती बँकेला करा. तुमच्या विनंतीनुसार बँक तुमची गॅरंटरमधून मुक्तता करते. जर तुमची नोकरी गमावली असेल, तर अशाही परिस्थितीमध्ये तुम्ही बँकेकडे गॅरंटर न राहण्याबद्दल अर्ज करू शकता. नोकरी गेल्याचा एखादा पुरावा संबंधित बँकेकडे सादर करा. गॅरंटर न राहण्याबद्दलचा अर्ज बँकेंकडे सादर करा. अशा परिस्थितीमध्ये बँक तुमची गॅरंटरमधून सुटका करते.
Bank Loan Guarantor Procedure Rules
Banking Finance