इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बँकेत नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, फेडरल बँक आणि कर्नाटक बँक विविध पदांसाठी वॉर्डन, अधिकारी आणि लिपिक पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवत आहेत. या पदांसाठी विहित पात्रता असलेले उमेदवार विहित अंतिम तारखेला संबंधित बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया
सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा द्वारा संचालित सर सोराबजी पोचखानवाला बँकर्स ट्रेनिंग कॉलेज, वॉर्डनच्या पदासाठी अर्ज आमंत्रित करते. उमेदवार 23 मे 2022 पर्यंत जारी केलेल्या अधिसूचनेत दिलेल्या अर्जाद्वारे अर्ज सादर करू शकतात. बँकेच्या लिंकवरून भरती अधिसूचना आणि अर्ज डाउनलोड करावी.
फेडरल बँक
फेडरल बँक, देशातील खासगी क्षेत्रातील बँकांपैकी एक, कनिष्ठ व्यवस्थापन ग्रेड 1 मधील अधिकारी पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे. दि.1 मे 2022 रोजी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून किमान 60 टक्के गुणांसह आणि कमाल 27 वर्षे वयोगटातील PG उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
ऑनलाइन अभियोग्यता मूल्यांकन, गट चर्चा, रोबोटिक मुलाखत आणि वैयक्तिक मुलाखत या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. इच्छुक उमेदवार दि. 23 मे 2022 पर्यंत बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरील करिअर विभागात जाऊन अर्ज करू शकतात. या लिंकवरून जाहिरात पहावी आणि बँकेच्या लिंकवरून अर्ज करावा.
कर्नाटक बँक
कर्नाटक बँक लिपिकांच्या पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे. 1 मे 2022 रोजी किमान 60 टक्के गुणांसह आणि कमाल 26 वर्षे वय असलेले कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करण्यास पात्र आहेत. उमेदवार अधिकृत वेबसाइटवर २१ मे पर्यंत अर्ज करू शकतात. बँकेच्या लिंकवरून भरतीची जाहिरात पहावी आणि या लिंकवरून अर्ज करावा.