मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – मार्च महिन्यात म्हणजे मार्च 2022 मध्ये महाशिवरात्री आणि होळी सारखे मोठे सण येत आहेत, त्यामुळे बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असल्यास, ही कामे लवकर करणे उपयुक्त ठरतील. कारण , मार्चमध्ये एकूण 13 दिवस बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मार्च 2022 च्या बँक सुट्ट्यांची यादी जारी केली आहे. या यादीनुसार पुढील महिन्यात काही दिवस बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही. यामध्ये 2रा आणि 4था शनिवार आणि रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्यांचा देखील समावेश आहे. आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, बँकिंग सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे होणारे सण किंवा त्या राज्यांमधील विशेष प्रसंगी सूचनांवर देखील अवलंबून असतात. या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाहीत. अशा स्थितीत मार्च महिन्यात बँकांचे कामकाज सुरळीत करण्यासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी बँकांच्या सुट्ट्यांची यादी पाहून नक्कीच बाहेर पडा नाहीतर तुमचा दिवस वाया जाईल.
मार्चमधील सुट्ट्यांची संपूर्ण यादी अशी
1 मार्च : (महाशिवरात्री) – आगरतळा, आयझॉल, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, इम्फाळ, कोलकाता, नवी दिल्ली, पणजी, पाटणा आणि शिलाँग वगळता बँका बंद राहतील.
3 मार्च: (लोसार)- गंगटोकमध्ये बँक बंद
4 मार्च : (चपचर कुट) – ऐजॉलमध्ये बँक बंद
6 मार्च: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
12 मार्च: शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार)
13 मार्च: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
17 मार्च: (होलिका दहन)- डेहराडून, कानपूर, लखनौ आणि रांचीमध्ये बँका बंद राहतील.
18 मार्च: (होळी / धुली वंदन / डोल जत्रा) – बंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, इंफाळ, कोची, कोलकाता आणि तिरुवनंतपुरम वगळता बँका बंद राहतील.
19 मार्च: (होळी / याओसांगचा दुसरा दिवस) – भुवनेश्वर, इंफाळ आणि पाटणामध्ये बँका बंद राहतील.
मार्च 20 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
22 मार्च: (बिहार दिन)- पाटण्यात बँका बंद राहतील.
26 मार्च: शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)
27 मार्च: रविवार (साप्ताहिक सुट्टी)