मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रत्येक नागरिकाला दररोज नसले तरी आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून दोन चार वेळा तरी बँकेत विविध कामांसाठी जावे लागते. सध्या ऑनलाईन पद्धतीने व्यवहार सुरू असले, तरी काही कामकाज प्रत्यक्ष बँकेत जाऊनच करावे लागते. त्यामुळे बँकेला नेमकी सुट्टी कधी आहे हे जाणून घेणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे ठरते. जून महिन्यात बँका 8 दिवस बंद राहतील. मात्र, काही सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी असतील.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जारी केलेल्या बँक सुट्ट्यांच्या यादीमध्ये राष्ट्रीय सुट्ट्यांव्यतिरिक्त शनिवार (2 रा आणि 4 था) आणि रविवारच्या पूर्व-अनुसूचित सुट्ट्यांचा समावेश आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र प्रताप जयंती आणि गुरु हरगोविंद जयंतीच्या दिवशी संपूर्ण देशात नव्हे, तर संबंधित राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे येथे संपूर्ण यादी पहा आणि जून महिन्यात बँका कधी बंद होतील ते जाणून घ्या.
बँक सुट्यांची यादी अशी
2 जून – महाराणा प्रताप जयंती (हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानच्या बँकांना सुट्टी)
5 जून – रविवार – साप्ताहिक सुट्टी
11 जून – दुसरा शनिवार – बँका बंद
12 जून – रविवार – साप्ताहिक सुट्टी
15 जून – संक्रांती आणि गुरु हरगोविंद जयंती – मिझोरम, जम्मू-काश्मीर, भुवनेश्वरमध्ये बँकांना सुट्टी
19 जून – रविवार – साप्ताहिक सुट्टी
25 जून – चौथा शनिवार – बँकांना सुट्टी
26 जून – रविवार – बँका बंद
दरम्यान, सुटी असूनही सर्वसामान्यांना कोणतीही अडचण येणार नाही. आरबीआयच्या निर्देशानुसार एटीएम सुरू राहतील. ज्या दिवशी बँका बंद असतील त्यादिवशी हवे असल्यास बँकांशी संबंधित काही कामेही करू शकता. कारण बँकांची ऑनलाइन सेवा नेहमीच कार्य करते. ऑनलाइन सेवेद्वारे सुटीच्या दिवशीही अनेक कामे पूर्ण करता येतात. त्याचबरोबर एटीएममध्येही ही सेवा सुरू आहे. यामुळे , आपण रोख व्यवहार, रोख ठेव आणि पासबुक अॅपडेटसाठी मशीन प्रिंट करू शकता.