मुंबई – नोव्हेंबर महिन्यात तुम्ही बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम करणार असाल तर इकडे लक्ष द्या. कारण आगामी महिन्यात वेगवेगळ्या राज्यांच्या सार्वजनिक सुट्टया पाहिल्या तर १९ दिवस बँका बंद राहणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, भाऊबीज, पाडवा, छटपूजा, गुरू नानक जयंती सारख्या अनेक सुट्ट्या बँकांना असणार आहेत. तुमची खूपच महत्त्वाची कामे असतील तर या यादीवर एकदा नजर टाका.
भारतीय रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबरमधील बँकांच्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या दिवशी सार्वजनिक सुट्टया असतील. आरबीआयने १, ३, ४, ५, ६, १०, ११, १२, १९, २२ आणि २३ नोव्हेंबपृरला सुट्ट्या घोषित केल्या आहेत. काही शहरांमध्ये स्थानिक सुट्टीही असू शकतात. रिझर्व्ह बँकेच्या दिशानिर्देशांनुसार, रविवारसह महिन्यातील दुसर्या आणि चौथ्या शनिवारीसुद्धा बँका बंद राहतील.
दिनांक आणि सुटीचे वेळापत्रक असे
१ नोव्हेंबर – कन्नड राज्योत्सव, कूट- बंगळुरू आणि इंफाळमध्ये बँका बंद
३ नोव्हेंबर – नरकचतुर्दशी- बंगळुरूमध्ये बँका बंद
४ नोव्हेंबर – दीपावली (लक्ष्मीपूजन), कालीपूजा – बंगळुरू वगळून सर्व राज्यांमध्ये बँका बंद
५ नोव्हेंबर – दीपावली (बलिप्रतिपदा), गोवर्धन पूजा – अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरू, डेहराडून, गंगटोक, जयपूर, कानपूर, लखनऊ, मुंबई आणि नागपूरमध्ये बँका बंद
६ नोव्हेंबर – भाऊबीज, चित्रगुप्त जयंती, लक्ष्मीपूजा, दीपावली, निंगोल चकोबा – गंगटोक, इंफाळ, कानपूर, लखनऊ आणि शिमला येथील बँका बंद
७ नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
१० नोव्हेंबर – छठपूजा, सूर्य षष्ठी डाला छठ – पाटणा आणि रांची येथील बँका बंद
११ नोव्हेंबर – छठपूजा – पाटणा येथील बँका बंद
१२ नोव्हेंबर – वंगला उत्सव – शिलाँग येथील बँका बंद
१३ नोव्हेंबर – शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार)
१४ नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
१९ नोव्हेंबर – गुरू नानक जयंती, कार्तिक पौर्णिमा – आयझॉल, बेलापूर, भोपाळ, चंडीगढ, डेहराडून, हैदराबाद, जयपूर, जम्मू कानपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर येथील बँका बंद
२१ नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
२२ नोव्हेंबर – कनकदास जयंती – बंगळुरू येथील बँका बंद
२३ नोव्हेंबर – सेंग कुट्सनाम- शिलाँग येथील बँका बंद
२७ नोव्हेंबर – शनिवार (महिन्यातील चौथा शनिवार)
२८ नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)