विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
बँक ग्राहकांना जून २०२१ मध्ये बँकेची कामे करण्यासाठी जास्त अडचणी येणार नाहीयेत. पुढील महिन्यात सण कमी आहेत. तसेच बँकांना काही शहरांमध्ये फक्त तीन दिवस सुटी असेल. त्याशिवाय शनिवार आणि रविवारीच सुटी असेल. आरबीआयच्या बँकांच्या सार्वजनिक सुट्यांच्या दिनदर्शिकेप्रमाणे जूनमध्ये बँकांची कामे सुरळीत चालणार आहेत. पुढील महिन्यात १५, २५ आणि ३० जूनला निवडक शहरांमध्ये बँका बंद राहतील.
बँका बंदची यादी
६ जून – रविवार (साप्ताहिक सुटी)
१२ जून- दुसरा शनिवार (बँका बंद असतात)
१३ जून – रविवार (सार्वजनिक सुटी)
१५ जून – मिथुन संक्रांत आणि रजपर्व (एजवल -मिझोरम, भुवेश्वरमध्ये बंद)
२० जून – रविवार (सार्वजनिक सुटी)
२५ जून – गुरू हरगोविंदजी यांची जयंती (जम्मू आणि श्रीनगरला बँका बंद)
२६ जून – दुसरा शनिवार (सार्वजनिक सुटी)
२७ जून – रविवार (सार्वजनिक सुटी)
३० जून – रेमना नी (एजवलची सुटी)
जुलैमध्ये ९ दिवस सुटी
जुलै २०२१ मध्ये बँक कर्मचार्यांना एकूण ९ अतिरिक्त सुट्या असतील. त्यातील काही सुट्या देशात कॉमनच असतील. काही सुट्या राज्यांच्या नियमांप्रमाणे असतील. सहा दिवस शनिवार आणि रविवारी बँकांना सार्वजनिक सुटी असेल.
डोअर स्टेप बँकिंग
कोविड महामारीमुळे बँकांनी आता डोअर स्टेप बँकिंग सेवा सुरू केली आहे. यामध्ये घरी बसूनच ग्राहकांना रोखीचे व्यवस्थापनापासून इतर कामे करता येतील.
कोणत्या सेवा मिळत आहेत
– रोकड मागविणे ( On call pick up)
– रोकड सुपूर्द करणे ( Beat pick up)
– धनादेश घेणे
– १५ एच फॉर्म घेणे
– ड्राफ्ट मागविणे
– खात्यामधील जमा रकमेची माहिती मागविणे
– हयातनामा घेणे
– के वाय सी कागदपत्र घेणे
—
घरी रोकड कशी मागवावी
– आपल्या बँकेत या सेवेच्या नोंदणीनंतर अॅपवर हवी असलेली सेवा निवडावी
– कॅश विथड्रॉवलचा पर्याय निवडावा
– पिकअप /ड्रॉपसाठी घराचा पत्ता टाकावा
– घराच्या १० किमीच्या आतच बँक असावी