विशेष प्रतिनिधी, मुंबई
जुलैमध्ये वेगवेगळ्या सणांच्या पार्श्वभूमीवर देशात बँका १५ दिवस बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पत्रकानुसार, रथयात्रा, भानू जयंती, बकरी ईद सारख्या सणांमुळे बँका बंद राहतील. जुलैत पहिला सण १२ तारखेला आहे. या दिवशी इंफाळ, भुवनेश्वर येथे रथयात्रा जल्लोषात साजरा करण्यात येते. त्यामुळे तिथे बँकांना सुट्टी असेल. महिना अखेर केर पूजा असल्यामुळे त्या दिवशी बँकांच्या कामाला ब्रेक असेल.
बँक सुट्यांचे वेळापत्रक असे
– ४ जुलैला रविवार असल्याने बँका बंद राहतील.
– १० जुलै, ११ जुलैला शनिवार आणि रविवार असल्यामुळे सुट्टी असेल.
– १२ जुलैला रथयात्रा असल्याने भुवनेश्वर आणि इंफाळमध्ये बँका बंद असतील.
– १३ जुलैला भानू जयंतीमुळे गंगटोक येथे बँका बंद असतील.
– १४ जुलैला दुरुकपा तेस्ची या सणामुळे गंगटोकमध्ये बँका बंद राहणार आहेत.
– १६ जुलैला डेहराडूनमध्ये हरेला सण असल्याने एक दिवस बंद राहील.
– १७ जुलैला खर्ची पूजेमुळे अगरतळा-शिलाँग येथील बँका बंद असतील.
– १८ जुलैला रविवारची सुट्टी असेल.
– १९ जुलैला गुरू रिम्पोशे थुंगकार मुळे गंगटोकमध्ये बँका बंद असतील.
– २० जुलैला बकरी ईदला जम्मू, श्रीनगर, तिरुअनंतपुरममध्ये बँका बंद राहणार आहेत.
– २१ जुलैला अगरतळा, अहमदाबाद, बंगळुरू, भोपाळ, चंडीगड, चेन्नई, कोलकाता, डेहराडून, गुवाहाटी, पाटणा, रायपूर, नवी दिल्ली, पणजी, रांचीमध्ये बकरी ईद साजरी होणार आहे. त्यामुळे बँका बंद असतील.
– २४ जुलै-२५ जुलैला शनिवार आणि रविवार असेल.
– ३१ जुलैला केरा पूजेनिमित्त अगरतला येथे बँका बंद राहणार आहेत.