मुंबई – २०२१ वर्ष सरत आहे आणि काही दिवसांतच नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे. नव्या वर्षाकडून अनेकांना चांगली आशा आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात बँक केव्हा बंद राहतील हे सुद्धा जाणून घ्यायला हवे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. जानेवारी २०२२ मध्ये कोणत्या राज्यात कोणत्या दिवशी बँकांना सुट्टी असेल याची माहिती देण्यात आली आहे. एकूणच पहिल्याच महिन्यात बँकांना १६ दिवस सुट्टी असेल. परंतु वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही संख्या वेगळी असेल. काही सुट्ट्या स्थानिक असतील.
तर चला मग ती यादीच पाहूया.
१ जानेवारी – नव्या वर्षाचा दिवस (सर्व राज्यांतील बँका बंद असतील.)
४ जानेवारी – लोसूंग (सिक्किम)
८ जानेवारी – दुसरा शनिवार
११ जानेवारी – मिशनरी डे (मिझोरम)
१२ जानोवारी – स्वामी विवेकानंद जयंती
१४ जानेवारी – मकरसंक्रांत, पोंगल (अनेक राज्यात)
१५ जानेवारी – उत्तरायण पुण्यकाळ, मकरसंक्रांत उत्सव, माघे संक्रात, पोंगल, तिरुवल्लूर दिवस (पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, तामिळनाडू)
१८ जानेवारी – थाई पूसम (चेन्नई)
२२ जानेवारी – चौथा शनिवार
२६ जानेवारी – प्रजासत्ताक दिन (देशभरात सुट्टी)
३१ जानेवारी – मी-डॅम-मे-फी (आसाम)
सोळा दिवस बँका बंद
जानेवारी २०२२ मध्ये दोन राष्ट्रीय सुट्ट्या असतील. पहिली – नव्या वर्षाचा पहिला दिवस आणि दुसरी -२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन. २ जानेवारी, ९, १६,२३ आणि ३० जानेवारी रोजी देशभरातील सर्व बँकांना रविवारी सुट्टी असेल. आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रविवारशिवाय महिन्याच्या दुसर्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील.