मुंबई – सध्याच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानामुळे डिजिटल माध्यमावर विविध बँकिंग सुविधा उपलब्ध असूनही, काही वेळा महत्त्वाच्या कामासाठी प्रत्येक व्यक्तीला बँकेत जावे लागते. विशेषतः धनादेश क्लियरन्स, कर्ज आणि इतर सेवांसाठी ग्राहकांना बँक शाखेत काम असते. आता नोव्हेंबर महिना संपण्यास केवळ 4 दिवस बाकी असून यानंतर वर्षाचा शेवटचा महिना डिसेंबर सुरू होईल. हा वर्षाचा शेवटचा महिना असल्याने तो अनेक अर्थाने महत्त्वाचा ठरतो. या संदर्भात, डिसेंबरमध्ये बँका कधी बंद होतील हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
बहुतेक बँकांच्या सुट्ट्या राज्यानुसार बदलतात. डिसेंबरमध्ये देशात एकूण 16 दिवस बँका बंद राहणार आहेत. सर्व रविवारी वीकेंडची सुट्टी आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टीचा नियम देशभरात लागू होईल. मात्र आरबीआयनुसार, देशभरातील सार्वजनिक, खाजगी आणि परदेशी बँका, सहकारी बँका आणि प्रादेशिक बँका ठराविक तारखांना बंद राहतील. डिसेंबरमध्ये येणार्या बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केली आहे. बघा, बँक सुट्ट्यांची सविस्तर यादी
3 डिसेंबर – सेंट फ्रान्सिस झेवियरचा उत्सव व कनकदास जयंती (गोवा -पणजीत बँका बंद)
5 डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
11 डिसेंबर – शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार)
12 डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
18 डिसेंबर – यू सो सो थामची पुण्यतिथी (मेघालय – शिलाँगमध्ये बँका बंद)
19 डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
24 डिसेंबर – ख्रिसमस सण (मिझोराम – आयझॉलमध्ये बँका बंद)
25 डिसेंबर – ख्रिसमस ( कर्नाटक – बंगळूरु आणि ओडिशा – भुवनेश्वर वगळता सर्व ठिकाणी बँका बंद) (महिन्याचा चौथा शनिवार)
26 डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
27 डिसेंबर – ख्रिसमस सेलिब्रेशन (मिझोराम – आयझॉलमध्ये बँका बंद)
30 डिसेंबर – यू कियांग नोंगबाह (मेघालय -शिलॉन्गमध्ये बँका बंद)
31 डिसेंबर – नवीन वर्षाची पूर्वसंध्या (मिझोराम – आयझॉलमध्ये बँका बंद)