मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सध्याच्या काळात बँकेचे कामकाज ऑनलाइन पद्धतीने करता येणे ग्राहकांना शक्य असले तरी काही वेळा प्रत्यक्ष बँकेत जावेच लागते. परंतु बँकेला जर सुट्टी असेल तर अडचण निर्माण होते. आता 10 दिवसांनंतर एप्रिल महिना सुरू होत आहे. एप्रिल हा नवीन आर्थिक वर्षाचा प्रारंभ आहे, आर्थिक कामाचा ताण वाढेल, तर एप्रिल महिना बँकांच्या सुट्ट्यांचाही भरलेला आहे. गुढीपाडवा, आंबेडकर जयंती आणि बैसाखी या सणांमुळे पुढील महिन्यात एकूण 15 दिवस बँका बंद राहणार आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने एप्रिल 2022 च्या बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार पुढील महिन्यात एप्रिलमध्ये एकूण 15 दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेश आहे. आरबीआयने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, बँकिंग सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे होणारे सण किंवा त्या राज्यांमधील विशेष प्रसंगी नोटिफिकेशनवर अवलंबून असतात. या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाहीत.
एप्रिलमधील बँकांच्या सुट्या खालीलप्रमाणे
1 एप्रिल – बँक खाती वार्षिक बंद – जवळपास सर्व राज्यांमध्ये बँका बंद आहेत.
2 एप्रिल – गुढी पाडवा / उगादी सण / नवरात्रीचा पहिला दिवस / तेलुगु नववर्ष / साजिबू नोंगमपांबा (चैरोबा) – बेलापूर, बंगळुर, चेन्नई, हैदराबाद, इम्फाळ, जम्मू, मुंबई, नागपूर, पणजी आणि श्रीनगरमध्ये बँका बंद.
3 एप्रिल – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
4 एप्रिल – सारिहुल-रांची येथे बँक बंद.
5 एप्रिल – बाबू जगजीवन राम यांचा जन्मदिन – हैदराबादमध्ये बँका बंद.
9 एप्रिल – शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार)
10 एप्रिल – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
14 एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती/ महावीर जयंती/ बैसाखी/ तामिळ नववर्ष/ चैरोबा, बिजू उत्सव/ बोहर बिहू – शिलाँग आणि शिमला व्यतिरिक्त इतर ठिकाणी बँका बंद.
15 एप्रिल – गुड फ्रायडे/बंगाली नववर्ष/हिमाचल डे/विशू/बोहाग बिहू – जयपूर, जम्मू आणि श्रीनगर व्यतिरिक्त इतर ठिकाणी बँका बंद.
16 एप्रिल – बोहाग बिहू – गुवाहाटीमध्ये बँक बंद,
17 एप्रिल – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
21 एप्रिल – गदिया पूजा – आगरतळामध्ये बँका बंद.
23 एप्रिल – शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)
24 एप्रिल – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
29 एप्रिल – शब-ए-कदर/जुमत-उल-विदा – जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद.
एप्रिलमध्ये 2 लाँग वीकेंड्स आहेत, जेथे ग्राहकांना काम पूर्ण करण्यासाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागू शकते. 1 एप्रिलपासून बँक खाती वार्षिक बंद होणार आहेत, ज्या दिवशी बहुतेक शाखा बंद होणार नाहीत. 1 एप्रिलला शुक्रवार, 2 एप्रिलला गुढीपाडव्याचा सण आहे आणि त्यानंतर 3 एप्रिलला रविवार आहे, म्हणजेच महिन्याची सुरुवात बँक शटडाऊनने होईल. त्याच वेळी, दुसरा लाँग वीकेंड 14 ते 17 एप्रिल आहे.
बँकांच्या सुटीच्या कालावधीत बँकेचे ग्राहक नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगद्वारे त्यांचे बँकिंग काम करू शकतात, परंतु जर शाखेत जाणे आवश्यक असेल, तर ग्राहकांना हे माहित असणे आवश्यक आहे की, एप्रिलमध्ये कोणत्या दिवशी बँका बंद असतील.