मुंबई – आजच्या काळात अनेक बँकिंग व्यवहार ऑनलाइन पद्धतीने होत असले, तरी अद्यापही सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच व्यवसायिकांना प्रत्यक्ष बँकेत जाऊनच व्यवहार करावे लागतात. परंतु या महिन्यात बँकांना नऊ दिवस सुट्टी असल्याने ग्राहकांना अत्यावश्यक व्यवहार करताना काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
भारतीय बँकांची दीर्घ सुट्टी उद्यापासून म्हणजेच दि. १४ ऑगस्टपासून सुरू होत आहे. १४ ते १६ ऑगस्ट दरम्यान बँका सतत तीन दिवस बंद राहतील. आरबीआयच्या वेबसाइटनुसार, सरकारी सुट्ट्यांसह या महिन्यात रविवार आणि शनिवार अधिक पडत आहेत. यामुळे बँकेच्या कामकाजाच्या दिवसांमध्ये वाढ झाली आहे. प्रत्येक राज्यात बँक सुट्ट्या सारख्या नसतात. राज्यांच्या सणानुसार वेगवेगळ्या तारखांना बँका बंद राहतील. ऑगस्टमध्ये एकूण ९ दिवस बँका बंद राहतील. यामध्ये शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे.
बँक सुट्टीची यादी अशी
१४ ऑगस्ट – महिन्याच्या दुसरा शनिवार
१५ ऑगस्ट – रविवार आणि स्वातंत्र्य दिन
१६ ऑगस्ट – पारसी नवीन वर्ष (पतेती)
१९ ऑगस्ट- मोहरम
२० ऑगस्ट- ओणम (कर्नाटक, केरळ, तामिळनाडू)
२२ ऑगस्ट- रक्षाबंधन आणि रविवार
२८ऑगस्ट- महिन्याचा चौथा शनिवार
२९ऑगस्ट- रविवार
३०ऑगस्ट- जन्माष्टमी