चंदीगड (पंजाब) – चेक बाऊन्स प्रकरणी याचिकाकर्त्याला झटका देत पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली आहे. कारण याचिकाकर्त्याचा असा दावा केला आहे की, चेकवर त्याची स्वाक्षरी आहे, परंतु तो चेक दुसऱ्याने भरला आहे, ज्याची त्याला माहिती नाही.
पंचकुला येथील रहिवासी असलेल्या पीडित महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, एका व्यक्तीने १५ ऑक्टोबर २०११ रोजी तिच्या पतीकडून ८ लाख रुपये उसने घेतले होते. त्यानंतर १५ डिसेंबर २०१३ रोजी त्या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला. तेव्हा त्या व्यक्तीला कर्जाची रक्कम परत करण्यास सांगितले असता, त्याने ३१ मार्च २०१४ रोजी तिला एक धनादेश दिला. मात्र हा धनादेश दिला असता, त्या खात्यात पैसे शिल्लक नसल्यामुळे बाऊन्स झाला. त्यामुळे महिलेने यांच्या न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र सदर व्यक्तीने त्या महिलेविरूध्द याचिका दाखल केली.
जिल्हा न्याय दंडाधिकारी यांनी तक्रारदार महिलेच्या बाजूने निकाल देताना, ६ व्याजासह ८ लाख रुपये परत केले करण्याचे आदेश याचिकाकर्त्याला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली. या निर्णयाला अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या न्यायालयात आव्हान देण्यात आले. अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनीही याचिकाकर्त्याच्या युक्तिवादाशी सहमत नसून सीजेएमचा निर्णय कायम ठेवला होता.
या दोन्ही निर्णयाविरोधात याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात अपील दाखल केले. याचिकाकर्त्याच्या युक्तिवादाशी असहमती दर्शवत उच्च न्यायालयाने म्हटले की, याचिकाकर्ताने चेक दिल्यानंतर त्यात नमूद केलेली रक्कम भरण्याची जबाबदारी टाळू शकत नाही. कारण धनादेशावरील स्वाक्षरी याचिकाकर्त्याचीच आहे, त्यांनी ती मान्य केली आहे, अशा स्थितीत तपशील अन्य कोणी भरला तरी याचिकाकर्त्याला निश्चित रक्कम भरावी लागेल.