मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – कोणत्याही बँक ग्राहकाचे खात्यातून पैसे कपात झाले की, लगेच त्याला एसएमएस येतो, परंतु यापुढे असे एसएमएस येणार नाही. पेमेंट अॅपने सरकारला तशी विनंती केली आहे. मोठ्या संख्येने ग्राहक Google Pay आणि Paytm सारखे ऑनलाइन पेमेंट अॅप्स वापरतात. परंतु ग्राहक व्यवहार करता तेव्हा MMS द्वारे कपात केलेला अलर्ट येतो. पण लवकरच त्यात बदल होणार आहे. खरे तर, आता पेमेंट अॅप्सनी सरकारला संदेश सूचनांऐवजी अॅपमधील अलर्टचा विचार करण्याचे आवाहन केले आहे.
Google Pay आणि Paytm सारख्या लोकप्रिय पेमेंट अॅप्सनी बँकिंग व्यवहारांसाठी SMS अलर्टऐवजी अॅपमधील सूचनांचा विचार करण्यासाठी सरकारकडे याचिका दाखल केली आहे. एका अहवालानुसार, एसएमएस सूचनांऐवजी अॅपमधील अलर्ट निवडण्यामागील कारण जास्त किंमत आणि सुरक्षिततेचा धोका असल्याचे म्हटले आहे. तसेच या अहवालात पुढे नमूद करण्यात आले आहे की, ३० मे रोजी नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज (NASSCOM) ने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (RBI) एक याचिका पाठवून बँकिंग व्यवहारांसाठी अॅप-आधारित सूचनांना परवानगी देण्याबाबत विचार करण्याची विनंती केली होती.
त्यात म्हटले आहे की, अॅप-मधील सूचनांसाठी अंदाजे किंमत 0.001 रुपये असेल, तर एसएमएस अलर्ट पाठवण्याची किंमत 0.12 रुपये असेल. 2021 – 2022 या आर्थिक वर्षात 8,734 कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार झाले आहेत आणि त्यासाठी एसएमएस नोटिफिकेशन्सची किंमत सुमारे 1048 कोटी रुपयांवर पोहोचल्याचे पुढे सांगण्यात आले.