इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गुजरातमधील अहमदाबादमध्ये बँक मॅनेजर आणि खातेदारामध्ये बँक खात्यातील रक्कम कपात झाल्यावरुन अगोदर शाब्दीक वाद झाला. नंतर त्याचे पर्यावसन थेट हाणामारीत झाले. आता या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून तो चांगलाच चर्चेत आहे.
या व्हायरल व्हिडिओवर नेटीझन्सही कमेंट करत असून काहींनी बँक मॅनेजरची बाजू घेतली आहे तर काही जण खातेदाराच्या अरेराववीवर कमेंट करत आहे. अहमदाबादच्या प्रेमनगरच्या युनियन बँक शाखेत हा गोंधळ घडला आहे. टीडीएस कपातीच्या मुद्दयावरुन बँक मॅनेजर आणि खातेदारात हा वाद झाला.
बँक मॅनेजर सौरभ सिंह आणि एसयुडी लाईफ इन्शुरन्सचे कर्मचारी शुभम जैन यांच्यासोबत मारहाण केली होती. शुभम नावाच्या बँक कर्मचारीसोबत वाद घालत असतांना बँक मॅनेजर मध्यस्ती करण्यासाठी येतात. त्यावेळी खातेदार आणि बँक मॅनेजर यांच्यात वाद होतो व नंतर मारहाण. याचा व्हिडिओ एकाने काढला असून तो ४४ सेंकदाचा आहे. या प्रकरणात स्थानिक पोलिस ठाण्यात खातेदाराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.