इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क –
उत्तर प्रदेशमधील मोकामा येथे एक्सिस बँकेच्या शाखेत एका खातेधारकाच्या नावावर फसवणूक करून पाच लाखांचे कर्ज मंजूर करून पैसे काढणाऱ्या बँकेच्या सहाय्यक व्यवस्थापकाला पोलिसांनी अटक केली आहे. बँकेचे खातेधारक असलेल्या रामप्रवेश कुमार यांनी १३ ऑक्टोबर २०२१ रोजी मोकामा पोलिस ठाण्यात लेखी अर्ज करून तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांना माहिती न देताच फसवणूक करून पाच लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून ४ लाख ४८ हजार रुपये काढून घेण्यात आले. बँकेत तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यास त्यांना पिटाळून लावले जाते. त्यांच्या तक्रारीनंतर मोकामा पोलिस ठाण्याकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
पोलिसांनी तांत्रिक तपास केल्यानंतर असे आढळले की, बँकेच्या सध्याचे सहाय्यक शाखा व्यवस्थापक मो. हसनैन याने खातेधारक रामप्रवेश कुमार यांच्या बचत खात्यात कस्टमर रिक्वेस्ट फॉर्म भरून खातेधारकाचा नोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून आपल्या पत्नीचा मोबाईल नंबर नोंदवला. त्यानंतर बनावट पद्धतीने डेबिट कार्ड जारी करून पाच लाख रुपयांचे कर्ज मंजूर करवून घेतले.
डेबिड कार्डद्वारे बाढ, लखिसराय या ठिकाणांसह इतर ठिकाणांवरून एकूण ४ लाख ४८ हजार रुपये काढून घेतले. आरोपी मो. हसनैन हा मुजफ्फरपूर जिल्ह्यातील कुढनी पोलिस ठाणे क्षेत्रातील बलौर गावातील रहिवासी आहे. मोकामा पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजनंदन म्हणाले, की फसवणूक करून कर्ज मंजूर करून पैसे काढणऱ्या सहाय्यक शाखा व्यवस्थापक मो. हसनैन याला अटक करण्यात आली आहे. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला