विशेष प्रतिनिधी, बंगळुरू
कर्नाटक सरकार सध्या विशेष चर्चेत असून त्याचे मुख्य कारण आहे ते बंगळुरु शहरातील ३ हजाराहून अधिक कोरोना बाधितांचे गायब होणे. या रुग्णांमुळे बंगळुरू शहरासह कर्नाटकमध्ये कोरोनाचा फैलाव होण्याची भीती आहे. त्यामुळे राज्य सरकारने विशेष मोहिम हाती घेतली आहे.
बंगळुरु शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. तो कसा आटोक्यात आणावा यासाठी राज्य सरकार खटपट करीत आहे. मात्र, त्यातच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. शहरातील २ ते ३ हजार कोरोना बाधित हे अचानक गायब झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या बाधितांचे मोबाईल फोन हे स्विच ऑफ (बंद) आढळून येत आहेत. तसेच, त्यांचे घरही रिकामे असल्याचे प्रशासनाला आढळून आले आहे. त्यामुळे प्रशासन आणि सरकारची धडधड वाढली आहे. हे सर्व जण कुठे गेले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील २ ते ३ हजार कोरोना रुग्णांचा शोध सुरु आहे. हेच रुग्ण नंतर आयसीयु किंवा ऑक्सिजन बेडसाठी प्रयत्न करतील. पोलिसांना या रुग्णांच्या शोधार्थ जबाबदारी देण्यात आली आहे, अशी माहिती महसूलमंत्री आर अशोक यांनी सांगितले आहे.
https://twitter.com/ANI/status/1387640001895141379