इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय क्रिकेट संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही संघात ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू आहेत. पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला होता. त्यानंतर मालिकेतील दुसरी लढत आज बुधवारी दि. ७ डिसेंबर रोजी झाली मात्र दुसऱ्या वनडे मध्ये टीम इंडियाचा केवळ ५ धावांनी पराभव झाला. आता तीन सामन्यांच्या वनडे मालिकेनंतर कसोटी मालिका देखील होणार आहे.
वास्तविक दुसरा वनडे सामना हा भारतासाठी करो या मरो, ठरणारा होता, कारण हा सामना भारताने गमावला तर त्यांचे या मालिकेतील आव्हान संपुष्टात येणार होते, आणि आता प्रत्यक्षात तसेच झाले, त्याआधी मीरपूर येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला बांगलादेश विरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. टीम इंडिया अवघ्या १८६ रन्सवर ऑलआऊट झाली. प्रत्युत्तरात १३६ धावांत ९ गडी गमावल्यानंतरही बांगलादेशने विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती.
इतकेच नव्हे तर आता दुसऱ्या वनडे मध्ये टीम इंडियाचा अवघ्या ५ रन्सनी पराभव झाला. टीम इंडियाने अखेरच्या चेंडूपर्यंत लढत दिली. जखमी रोहित शर्मा अखेरपर्यंत मैदानावर उभा होता. त्याच्या बॅटिंगमुळे टीम इंडियाच्या विजयाची आस निर्माण झाली होती. शेवटच्या चेंडूवर ६ रन्सची गरज होती. पण रोहितला षटकार मारता आला नाही. बांग्लादेशने विजयासाठी २७२ धावांचे लक्ष्य दिले होते. टीम इंडियाने ९ बाद २६६ धावा केल्या. रोहितने २८ चेंडूत नाबाद ५१ धावा केल्या.
विशेष म्हणजे मेहेदी हसन मिराज बांग्लादेशच्या विजयासाठी शानदार शतक ठोकले. बांग्लादेशने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. याआधी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली बांग्लादेशने टीम इंडियाला २-१ ने हरवले होते. सीरीजमधला तिसरा आणि शेवटचा सामना शनिवार, दि. १० डिसेंबर रोजी होणार आहे. बांग्लादेशने सलग दुसऱ्यांदा आपल्या देशात टीम इंडियाला वनडे सीरीजमध्ये हरवले आहे. आता तिसऱ्या सामन्यात काय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Bangladesh Win ODI Series India Defeat