शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बांधकाम कामगारांसाठी निवृत्तीवेतन योजना…दरवर्षी मिळणार इतके निवृत्तीवेतन

by India Darpan
मार्च 26, 2025 | 6:30 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
विधानभवन002 1024x512 1


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या आणि वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी ₹१२००० इतके निवृत्तीवेतन देण्यात येणार असल्याची माहिती कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली.

कामगार मंत्री ॲड.फुंडकर म्हणाले की, सन १९९६ मध्ये केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या हितासाठी कायदा लागू केला. त्यानुसार, महाराष्ट्र राज्याने २००७ मध्ये नियम आखले आणि २०११ मध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली. मंडळाकडे १८ ते ६० वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार नोंदणी करू शकतात व विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. मात्र, ६० वर्षांनंतर त्यांची नोंदणी होऊ शकत नाही व कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही.

ही बाब लक्षात घेऊन सरकारने निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असून या योजनेच्या अनुषंगाने, नोंदणी कालावधीवर आधारित लाभ निश्चित करण्यात आला असल्याचे मंत्री ॲड.फुंडकर यांनी सांगितले. यात १० वर्षे नोंदणी पूर्ण झालेल्या कामगारांना वार्षिक ₹६००० (५०%); १५ वर्षे नोंदणी पूर्ण झालेल्या कामगारांना वार्षिक ₹९००० (७५%) आणि २० वर्षे किंवा अधिक नोंदणी पूर्ण झालेल्या कामगारांना वार्षिक ₹१२००० (१००%) असे लाभ देण्यात येईल.

या निर्णयामुळे सध्या मंडळाकडे नोंदणीकृत ५८ लाख बांधकाम कामगार आणि त्यांचे कुटुंबीय तसेच भविष्यात नोंदणी होणारे बांधकाम कामगार लाभार्थी ठरणार आहेत.

कामगार मंत्री ॲड. फुंडकर यांनी सांगितले की, “या योजनामुळे लाखो बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांचे भविष्य सुरक्षित होणार आहे. कायद्याच्या तरतुदी व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन लवकरच या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर कार्यपद्धती निश्चित करण्यात येणार असल्याचे त्यांनी निवेदनाद्वारे सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

२ लाख १० हजार रुपयांची लाच घेतांना सुरगाणा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Next Post

दूध भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; राज्य सरकारने घेतला हा मोठा निर्णय

Next Post
संग्रहीत फोटो

दूध भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; राज्य सरकारने घेतला हा मोठा निर्णय

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011