सप्तशृंगीगड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत नाशिकच्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर देवस्थान ट्रस्ट व रोप वे चालक मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करीत त्या विरोधात येत्या ५ डिसेंबर रोजी सप्तशृंगी गड गाव बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. सप्तशृंगी निवासिनी ट्रस्ट नव्याने भरती केलेले सुरक्षा रक्षक ग्रामस्थाना आपमानास्पद वागणूक देतात. रोपेवेतून जाणाऱ्या भाविकांना त्वरित मंदिरात सोडले जाते. त्यामुळे पायरीने जाणारे भाविक अडकून पडतात. यासह विविध मागण्यांसाठी सप्तश्रृंगी गड बंदची हाक देण्यात आली आहे.