नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्याच्या काळात पारंपरिक पद्धतीने शेती केली तर त्यात नुकसानच होते, असे म्हटले जाते. त्यामुळे शेती व्यवसाय बाबत तरुणांमध्ये उदासीनताच दिसून येते, परंतु बांबू शेती ही प्रचंड फायद्याचे आहे असे म्हटले जाते. शेती विचारपूर्वक केली, तरी ती माणसाला बसून श्रीमंत बनवते. आता आधुनिक प्रकारच्या शेतीतून भरपूर पैसे कमावत आहेत. अशा परिस्थितीत ग्रीन गोल्ड नावाच्या बांबूची लागवडही यापैकीच एक आहे, ज्याचा कलही अलीकडच्या काळात वाढला आहे. मध्य प्रदेशचे शिवराज चौहाण यांचे सरकार बांबूच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना 50 टक्क्यांपर्यंत सबसिडी देत आहेत.
या शेतीत थोडी मेहनत केली तर नफा खूप मिळतो असे म्हणतात. याचे एक कारण म्हणजे देशात फार कमी शेतकरी बांबूची लागवड करतात पण मागणी जास्त आहे. इतर पिकांच्या तुलनेत बांबूची लागवड जास्त सुरक्षित असल्याचे अनेक मोठे शेतकरी आणि कृषी तज्ज्ञांचे मत आहे. तसेच त्यातून चांगले उत्पन्न मिळू शकते.
या शेतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही हवामानात खराब होत नाही. बांबू पिकाची एकदा लागवड केल्यास अनेक वर्षे उत्पादन घेता येते. बांबू लागवडीमध्ये खर्च कमी असतो, त्याचप्रमाणे मेहनतही कमी असते पण कमाईच्या बाबतीत ते उत्कृष्ट असते.
विशेष म्हणजे एका बांबूच्या रोपासाठी तीन वर्षांत सुमारे 240 रुपये खर्च येतो. एक हेक्टर जमिनीत 625 बांबू रोपे लावता येतात. बांबूची रोपे कोणत्याही नर्सरीतून विकत घेता येतात. अनेक शेतकरी आपल्या शेतात बांबूची रोपे लावतात आणि त्यात दोन-तीन वर्षे काम करून चांगले पैसे कमावतात. काही हेक्टर जमिनीवर बांबूची लागवड करून चार वर्षांत लाखोंचे उत्पन्न मिळू शकते.
जुलै महिन्यात बांबूची लागवड करणे सर्वोत्तम मानले जाते. बांबूचे रोप अवघ्या तीन महिन्यांत वाढू लागते. मात्र, बांबूची वेळोवेळी छाटणी करावी लागते. बांबूचे पीक साधारण तीन ते चार वर्षांत तयार होते. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत बांबूची कापणी करता येते. देशात बांबू लागवडीला चालना देण्यासाठी मध्य प्रदेश सरकार व्यतिरिक्त केंद्र सरकारने 2006-07 मध्ये राष्ट्रीय बांबू मिशन सुरू केले.